कोरोनाचं संकट अधिकाधिक गडद होताना दिसतंय. अनेक कलाकारांना कोरोनाची लागण झाली आहे. अभिनेत्री नेहा पेंडसेलाही कोरोनाची लागण झाली आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने याबाबतची माहिती दिली आहे. मला सौम्य लक्षणं जाणवत असल्याने मी कोरोना चाचणी केली. ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाईन आहे. घरात राहुनच मी सध्या उपचार घेतेय, असं नेहाने आपल्या इन्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय.
नेहाला मागच्या काही दिवसांपासून सौम्य लक्षणं असल्यामुळे तिने आपली चाचणी करून घेतली. दोनदा तिची चाचणी निगेटिव्ह आली. मात्र तिसऱ्यांदा चाचणी केली असता ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. नेहा घरात राहूनच उपचार घेत आहे.
नेहाने आपल्याला कोरोना झाल्याची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली. नेहाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलंय, ‘मला काही सौम्य लक्षणं जाणवत असल्याने मी कोरोना चाचणी केली. ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मी सध्या होम क्वारंटाईन आहे. घरात राहुनच मी सध्या उपचार घेत आहे. त्यामुळे मी सध्या शुटिंग करत नाहीये.’
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना कोरोनाची लागण झालीये. त्यांच्यावर सध्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हृतिक रोशनची पूर्व पत्नी सुझेन खान, कॉमेडियन वीरदास हे कलाकार सध्या कोरोना पॉझिटिव्ह आहेत.