मंकीपॉक्सीचे रुग्ण वाढत असल्याने न्यूयॉर्कमध्ये ही साथ सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. हे शहर आजाराच्या उद्रेकाचे कारण ठरून दीड लाख शहरवासीयांना संसर्ग होण्याची शक्यता आहे, अशी भीती प्रशासनाने व्यक्त केली. न्यूयॉर्कचे महापौर एरीक अॅडम आणि न्यूयॉर्क शहर आरोग्य विभागाचे आयुक्त अश्वीन वासन यांनी शनिवारी मंकीपॉक्सच्या उद्रेकामुळे सार्वजिनक आरोग्य आणीबाणी घोषित केली.
गेल्या काही आठवडय़ांपासून आम्ही नागरिकांना लस आणि चांगले उपचार देण्यासाठी प्रयत्न करून त्यांना सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शहरातील दीड लाख नागरिकांना या आजाराचा संसर्ग होण्याची शक्यता आहे, असेही त्यांनी सांगितले.