श्रावण सोमवारी या राशींवर महादेव होतील प्रसन्न; कार्यक्षेत्रात मिळेल मोठा लाभ

आज दिनांक १ ऑगस्ट २०२२. सोमवार. आज श्रावण शुक्ल चतुर्थी.विनायकी चतुर्थी.आज पहिला श्रावणी सोमवार आज तांदुळाची शिवामूठ वाहून शंकराची पूजा सुवासिनीनी करावी.आज चंद्राचे भ्रमण सिंह राशीत होणार आहे. पाहूया आजचे बारा राशींचे भविष्य.

मेष

आज चंद्र पंचम स्थानात असून , मानसिक शांतता लाभेल. राशीतील मंगळ राहू काळजी घ्या असे सुचवीत आहे. स्वभाव रागीट होईल.प्रवास योग येईल. उत्तम दिवस.

वृषभ

राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्र आज आर्थिक शुभ वार्ता देईल. थोडी दगदग होईल. मित्र मैत्रीणीना भेटण्याचा, सामाजिक जीवनात आनंद घेण्याचा उत्तम दिवस आहे.

मिथुन

कार्यक्षेत्रातील वाढती जबाबदारी तुम्हाला फलदायी ठरेल .जोडीदाराशी संबंध सुधारण्याचे योग आहेत..आर्थिक घडामोडी होतील. आज काही महत्वाच्या भेटी होण्याची शक्यता आहे . दिवस शुभ.

कर्क

द्वितीय चंद्र असून धार्मिक गोष्टीत मन रमेल .संतती संबंधी शुभ काळ. तणाव वाटेल. प्रवास होतील. आर्थिक लाभ होतील. एकूण दिवस समाधानात जाईल.

सिंह

आज चंद्राचा दिवसावर अनुकूल प्रभाव पडेल .फार ताण घेऊ नका. जास्तीचे काम पडेल. मित्र मैत्रिणी भेटतील धार्मिक कार्य घडेल. दिवस समाधानात घालवा.

कन्या

व्यय स्थानातील चंद्र कार्यालयीन व घरगुती कामात वाढ करेल. खरेदी साठी बाहेर जाण्याचं ठरेल. खर्च होईल.धार्मिक कार्यक्रम होईल. आनंद आणि उत्साहात दिवस पर पडेल.

तुला

आज चंद्र उच्च प्रतीचे फळ देण्यास सज्ज आहे. ,शिक्षणआणि कार्य क्षेत्रात चांगला लाभ मिळेल. आर्थिक लाभ होतील. संततीसाठी भाग्य दायक योग.दिवस चांगला.

वृश्चिक

कुटुंबातील व्यक्ती साठी काही तरी विशेष करण्याचा दिवस आहे. दुपारनंतर सामाजिक जीवनात यश मिळेल. भाग्य उदयास येईल. आर्थिक लाभ होतील . उच्च शिक्षणासाठी काही खर्च होईल. विद्यार्थ्यांना उत्तम दिवस.

धनु

आज कार्यक्षेत्रातील महत्वाच्या घडामोडींकडे लक्ष असू द्या. भाग्य स्थानातील चंद्र जोडीदाराची उत्तम साथ देईल. तुमचे विरोधक सध्या बलवान आहेत. काळजी घ्या. दिवस शुभ.

मकर

प्रवास, घरामध्ये काही नवीन घटना, महत्वाचे फोन असा हा दिवस आहे.आर्थिक खर्च होतील. भावंडा सोबत मजेत एकत्र घालवा. प्रवासाचे योग येतील.

कुंभ

आर्थिक लाभ करून देणारा दिवस आहे. राशीतील शनि सर्व बाजूने मदत करेल. काही कौटुंबिक कार्यक्रमात सहभाग घ्याल.संततीला वेळ द्या. कार्यक्षेत्रात यश. प्रकृती जपा. दिवस शुभ.

मीन

षष्ठ स्थानातील चंद्र मनःस्वास्थ्य कमी करेल. मात्र दिवस एकूण खूप गडबडीत जाणार आहे. प्रत्येक क्षेत्रात अडचणी येतील मध्यम असा दिवस आहे.

शुभम भवतू!!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.