संत तुकाराम महाराज मंदिर मकर संक्रांतीला 15 तास बंद राहणार

वाढत्या कोरोनाच्या संकटामुळं जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे नियम कठोर कारण्याबरोबच कडक निर्बंधही लावाले आहेत. ओमिक्रोन व कोरोनाच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत जिल्ह्यातील पर्यटनस्थळे (Tourist Places) बंद करण्याचा निर्णय नुकताच घेण्यात आला. त्यानंतर मकर संक्रातीच्या(Makar sankranti) निमिताने देहूतील (Dehu Temple )विठ्ठल रुक्मिणी आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज मंदिरात होणारी गर्दी टाळण्यासाठी 14 जानेवारी मकर संक्रातीला मंदिर बंद ठेवण्याचादेवस्थान प्रशासनानं घेतला आहे. 14 जानेवारीच्या पहाटे 5 पासून ते रात्री 8 वाजेपर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती देवस्थान प्रशासनाने दिली आहे.

महिलांची गर्दी रोखण्यासाठी नियोजन मकर संक्रातीच्या दिवशी पुणे जिल्ह्यासहामहाराष्ट्राच्या विविध भागातून महिला विठ्ठल रुक्मिणी आणि जगतगुरु संत तुकाराम महाराज यांना ओवसा वाहण्यासाठी देहू मध्ये दाखल होतात. मात्र मागील दोन वर्षी कोरोनाच्या निर्बंधामुळं सर्व देवस्थाने बंद होती. त्यामुळे सॅण उत्सवही मोठ्याप्रमाणात साजरे करता आलेले नाहीत. यंदा कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानेतसेच मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने महिलावर्ग मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी येण्याची शक्यता आहे. यामुळे कोरोनाच्या विषाणूंचा प्रसार वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे देवस्थान प्रशासनान हा निर्णय घेतला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर जनजीवन पुन्हा पूर्व पदावर येत असतानाच ओमिक्रॉनच्या नवीन विषाणूंच्या डोकेवर काढले. दिवसेंदिवस याची रुग्णसंख्या वाढतच आहे. या विषाणूंचे कम्युनिटी स्प्रेडींग सुरु झाले आहे. अश्यातच सार्वजनिक ठिकाणच्या गर्दीला आळा घातला नाहीत तर येत्या काळात रुग्णसंख्येची गंभीर परिस्थिती पाहायला मिळेल अशी भीती वैद्यकीय तज्ञ व्यक्त केली आहे. त्यामुळे शहर परिसरातील गर्दीला निर्णय घेण्यासाठी प्रशासनानं हा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.