कोरोनाच्या संकटातून तणामुक्त होण्यासाठी भारताचा माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनी सुट्ट्या घालवण्यासाठी शिमल्याला पोहोचला आहे. आपल्या परिवारासह जवळच्या लोकांना घेऊन माही शिमल्यात पोहोचला असून एकूण 12 लोकांसह माही शिमल्यात आहे. दरम्यान शिमल्यात पोहोचल्यावर धोनीने केलेला नवा लुक बराच चर्चेत आला असून धोनीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.
महेंद्र सिंह धोनी मागील आठवड्यात शिमल्याला पोहोचला. त्याच्यासाठी पूर्व रांचीच्या विमानतळावर मोठा पोलिस बंदोबस्त करण्यात आला होता. यावेळी काही सुरक्षारक्षकांनी धोनीसोबत फोटो काढले. जे फोटो व्हायरल झाल्यानंतर धोनी सुट्टी साठी बाहेर पडल्याचे समोर आले आहे.
धोनी शिमल्यात पोहोचल्याच्या बातमीनंतर काही दिवसांतच धोनीतचा नवा लूक व्हायरल झाला आहे. एका फोटमअध्ये धोनी त्याची मुलगी जीवासोबत दिसतो आहे. तर एका फोटोत धोनी हिमाचल प्रदेशची पारंपरिक टोपी घालताना दिसत आहे.
3 वर्षांत दुसऱ्यांदा शिमल्याला
मागील 3 वर्षांत दोन्ही दुसऱ्यांदा शिमल्याला पोहोचला आहे. याआधी 2018 मध्ये धोनी शिमल्यात गेला होता. त्यावेळेस एका जाहिरातीच्या चित्रीकरणासाठी धोनी शिमल्याला गेला होता. त्याने त्यावेळी तिथे बाईक रायडींग देखील केली होती. मात्र यंदा धोनी कोणत्याही व्यावसायिक कामासाठी नाही तर खाजगी कारणामुळे शिमल्याला आला आहे. त्याच्यासोबत फॅमिली आणि जवळचे असे एकूण 12 लोक आहेत. हिमाचल प्रदेशमधील नियमावली तेथील शासनाने काही दिवसांपूर्वीच काहीशी सैल केली. त्यामुळे केवळ कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असल्यास त्याठिकाणी एन्ट्री मिळत आहे.