‘धोनी है तो मुमकिन है’ असं क्रिकेटमध्ये बऱ्याचदा म्हंटल जात, परंतु आज खऱ्या अर्थाने चिन्नस्वामी स्टेडीयमवर रंगलेल्या चेन्नई विरुद्ध आरसीबी सामन्यात हे पाहायला मिळालं. फाफ डू प्लेसिस आणि मॅक्सवेल या दोघांनी आपल्या खेळीने चेन्नईच्या खेळाडूंना नाकीनऊ आणलेलं असताना अखेर धोनीने दोघांच्या कमाल कॅचेस पकडून त्यांचा झंजावात थांबवला.
बंगळुरूच्या चिन्नस्वामी स्टेडियमवर चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बँगलोर यांच्यात आयपीएल 2023 मधील 24 वा सामना खेळवण्यात आला. या सामन्यात चेन्नईने आरसीबीचा 8 धावांनी पराभव करून यंदाच्या आयपीएलमधील तिसरा विजय मिळवला. या सामन्यात चेन्नईने आरसीबीला विजयासाठी 227 धावांच आव्हान दिलं होत.
चेन्नईने विजयासाठी दिलेलं हे आव्हान पूर्ण करण्यासाठी आरसीबीचा संघ मैदानात उतरला. चेन्नईला विराट कोहली आणि महिपाल लोमरोर यांच्या विकेट घेतण्यात यश आले परंतु यानंतर कर्णधार फाफ डू प्लेसिस आणि मॅक्सवेल या दोन फलंदाजांची विकेट घेण्यासाठी चेन्नईला मोठे परिश्रम करावे लागले. फाफ डू प्लेसिस आणि मॅक्सवेल या दोघांनी मैदानात येताच चौकार षटकारांची आतिषबाजी करण्यास सुरुवात केली होती. फाफ डू प्लेसिसने 33 चेंडूत 62 धावा केल्या तर मॅक्सवेलने 36 चेंडूत 76 धावा केल्या.
फाफ डू प्लेसिस आणि मॅक्सवेल हे दोघे मैदानावर जबरदस्त कामगिरी करत असताना चेन्नईच्या खेळाडूंना या दोघांची विकेट घेण्याच्या दोन ते तीन संधी मिळाल्या
होत्या. परंतु क्षेत्ररक्षण करणाऱ्या खेळाडूंकडून कॅच सुटल्यामुळे आरसीबीच्या खेळाडूंना जीवदान मिळाले. परंतु अखेर धोनीने फाफ डू प्लेसिस आणि मॅक्सवेल या दोघांच्या कॅच घेऊन त्यांना पॅव्हेलियनमध्ये पाठवले. प्रथम गोलंदाज महेश थेक्षानाने टाकलेल्या 13 ओव्हरमधील पहिल्याच बॉलवर मॅक्सवेलने मारलेल्या शॉटचा कॅच एम एस धोनीने पकडला. तर यानंतर 14 व्या ओव्हरमध्ये मोईन अलीच्या बॉलवर फाफ डू प्लेसिसने मारलेला शॉट देखील धोनीने कुशलतेने पकडला.
फाफ डू प्लेसिस आणि मॅक्सवेल या दोन महत्वाच्या फलंदाजांची विकेट घेणे हा या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला. या दोन विकेट्समुळेच आरसीबीची रनमशीन थांबवण्यात चेन्नईला यश आले. धोनीने पकडलेल्या या कमाल कॅचेसचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहेत.