मुकेश खन्ना यांनी त्यांच्या फिल्मी करिअरची सुरूवात रूही सिनेमातून केली होती. मात्र त्यांना खरी ओळख छोट्या पडद्यामुळं मिळाली. 1988 मध्ये दूरदर्शनवरील महाभारत मालिकेत त्यांनी भीष्म तर शक्तिमान मालिकेत गंगाधरची भूमिका साकारली होती. या भूमिकेमुळे त्यांना खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. भारतीय टीव्हीच्या इतिहासातील शक्तीमाना हा पहिला सुपरहिरोचा शो होता. या शोची लहानापांसून मोठ्यांपर्यंत सर्वांच्यातच क्रेझ होती. विक्की कौशलचे वडील शाम कौशल यांच्या दिग्दर्शनात बनलेल्या एक जाहिरातीच्या चित्रीकरणाचा असाच एक किस्सा मुकेश यांनी सांगितला होता.
मुकेश खन्ना सोशल मीडियावर प्रचंड सक्रीय असतात. मुकेश यांचा एक युट्यूब चॅनेल देखील आहे. या चॅनेलवर ते काही चित्रीकरणावेळीचे काही जुने- नवे किस्से शेअर करत असतात. त्यांची लोकप्रियतेचा अंदाज यावरुन तुम्ही लावू शकता. त्यांचे इन्स्टाग्रामवर 135K फॉलोवर्स आहेत. मुकेश खन्ना यांनी असाच शक्तीमानच्या शुटिंवेळचा एक किस्सा सांगितला आहे. यावेली ते चक्क शंभर फूटावरून खाली कोसळले होते.
नव्वदच्या दशकातील लोकांना ‘शक्तीमान’ ही टीव्ही मालिका चांगलीच आठवत असेल. दूरदर्शनवर प्रसारित होणारी ‘शक्तीमान’ ही मालिकेतील शक्तीमानला कॉपी करण्याचा प्रयत्न अनेक मुले करत असत. हा शो जेव्हा प्रसारित होत असे तेव्हा याची पुनरावृत्ती न करण्याचा वारंवार इशारा देण्यात येत असा. शक्तीमान हा 90 च्या दशकातील पहिला काल्पनिक सुपरहिरो होता, जो कुठेही उड्डाण करू शकतो. पण या युगात आजच्यासारखं तंत्रज्ञान विकसित झालं नव्हतं, त्यामुळे कलाकारांना स्टंट शूट करण्याची जोखीम पत्करावी लागत असे. शूटिंगचा असाच एक किस्सा या अभिनेत्याने सांगितला आहे.
अन् 100 फूटावरून खाली कोसळलो…
मुकेश खन्ना यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘शक्तीमान’चं शूटिंग संपल्यानंतर एका जाहिरातीचं शूटिंग होणार होतं. शक्तीमानचे स्टंट दिग्दर्शक असलेले प्रसिद्ध स्टंट दिग्दर्शक शाम कौशल या जाहिरात चित्रपटाच्या स्टंटचे दिग्दर्शन करत होते. मला वायरने बांधलं जायचं, नंतर क्रेनने वर ओढलं जायचं आणि मी हवेत तंरगायचो. शॉटनंतर मला उतरवण्यात येत असे..तेव्हा 6 माणसे ती तार धरून मला सॉफ्ट लँडिंग करायला लावायची. मी एका शॉटचा सराव करत होतो, वर गेलो आणि खाली येताच सॉफ्ट लँडिंग करण्याऐवजी मी दण करून खाली कोसळलो.. वेदनेने किंचाळत मी जमिनीवर पडलो. पायाचे हाड तुटले होते, मला बरेच दिवस व्हीलचेअरवर राहावे लागले होते.
मुकेश खन्ना ‘शक्तिमान’मध्ये दुहेरी भूमिकेत होते. मालिकेचे निर्माते ते स्वत: होते, तर दिग्दर्शक दिनकर जानी होते. या मालिकेत गीताच्या भूमिकेत मुकेशव्यतिरिक्त वैष्णवी महंत, कितू गिडवानी, टॉम अल्टर आणि सुरेंद्र पाल मुख्य भूमिकेत होते.