काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी आणि खासदार राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने नोटीस बजावली आहे. या नोटीसनुसार सोनिया यांना 8 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राहुल गांधी यांना 3 जूनला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण राहुल गांधी सध्या परदेशात असल्याने त्यांची 13 किंवा 14 जूनला चौकशी होऊ शकते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राज्यातीलही राजकारण तापण्याची शक्यता आहे. कारण काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना बजावण्यात आलेल्या ईडी समन्सवरुन ईडी अधिकाऱ्यांना मोठा इशारा दिला आहे. राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांना हात तर लावून दाखवा, असा उल्लेख करत पटोलेंनी ईडीला धमकीवजा इशारा दिला आहे.