बदाम हे आपल्या शरीरासाठी अत्यंत उपोयोगी असते. योग्य प्रमाणात खाल्ल्यास बदामामुळे शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. बदामाप्रमाणेच त्याचे दूध देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. बदामाच्या दुधात शरीरासाठी आवश्यक असलेले व्हिटॅमिन ई, लोह आणि मॅग्नेशियम आढळते. तसेच त्यात अँटीऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म देखील आढळतात. यामुळे अनेक आजारांवर मात करण्यास मदत होते. विशेष म्हणजे या दुधात कोलेस्टेरॉल आणि सॅच्युरेटेड फॅट नसते आणि कॅलरीज देखील कमी असतात. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त असते.
रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी : बदामाच्या दुधात भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन-डी आणि व्हिटॅमिन-ई आढळते. तसेच यात आढळणाऱ्या अँटीऑक्सिडेंट गुणधर्मांमुळे रोगांशी लढण्याची क्षमता वाढण्यास मदत होते. त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासाठी बदामाचे दूध फायदेशीर ठरू शकते.
हृदयासाठी उपयुक्त : बदामाचे दूध हृदयासाठी अत्यंत फायदेशीर ठरू शकते. बदामाचे दूध बॅडल कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी आणि गुड कोलेस्ट्रॉलची पातळी उत्तम ठेवण्यासाठी उपयुक्त ठरू शखते. यामुळे रक्तवाहिन्यांमध्ये कुठलाही अठथळा निर्माण होत नाही आणि ह्रदय देखील निरोगी राहण्यास मदत होऊ शकते.
त्वचेसाठी उपयुक्त : बदामाचे दूध प्यायल्याने त्वचेच्या अनेक समस्यांपासून आराम मिळू शकतो. बदामाच्या दुधात असणारे व्हिटॅमिन-डी त्वचेचा सुर्याच्या अतिनील किरणांपासून आणि हानिकारक बॅक्टेरियापासून बचाव करते तर व्हिटॅमिन-ईमुळे त्वचेला एक प्रकारचे संरक्षण कवच प्राप्त होते. यामुळे त्वचेचे अनेक आजार दूर ठेवण्यास मदत होते.
डोळ्यांसाठी फायदेशीर : बदामाचे दूध डोळांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते. यात व्हिटॅमिन-ए आणि व्हिटॅमिन-डी आणि रिबोफ्लेविनसारखे डोळ्यांसाठी उपयुक्त असलेले घटक आढळतात. त्यामुळे मोतीबिंदूसारख्या समस्यांवर मात करण्यास मदत होऊ शकते.
केसांसाठी फायदेशीर : केसांसाठी बदाम जसे फायदेशीर असतात तसेच निरोगी आणि लांब केंसासाठी बदामाचे दूध खूप फायदेशीर ठरू शकते. यात आढळणारे प्रोटीन्स, व्हिटॅमिन्स आणि टोकोफेरॉलसारखे घटक केसांसाठी अतिशय उपयुक्त असतात.
हाडांसाठी उपयुक्त : बदामाच्या दुधात मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन-डी आणि कॅल्शियम आढळते. त्यामुळे हे दूध पिल्याने हाडे मजबूत होण्यासाठी आणि हाडांचा विकास होण्यासाठी खूप फायदा होऊ शकतो. त्यामुळे बदामाचे दुध मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते.
(सूचना : येथे दिलेली माहिती सामान्य वैद्यकीय माहितीवर आधारित आहे. Sdnewsonline त्याची हमी देत नाही.)