एका बिबट्याचा वेगळाच व्हिडिओ समोर आला आहे. एका कार आणि बिबट्याचा हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. बिबट्याने चक्क कारवर संताप व्यक्त केला आहे. अहमदनगर जिल्ह्यात हा प्रकार घडला.
काय आहे व्हिडिओत
एक कार नाशिकहून पुण्याकडे जात होती. याचदरम्यान, एक बिबट्या रस्ता ओलांडत असताना त्याला एका कारने धडक दिली. यात बिबट्या कारच्या बोनेटमध्ये अडकला. कारचालकाचे हे लक्षात आल्यानंतर कार चालकाने बिबट्याला वाचविण्यासाठी गाडी मागे घेतली. मात्र, या बिबट्याने जे केले ते अंगावर थरकाप उडवणारे होते. बिबट्याने कारने त्याला धडक दिल्यावर कारवरच संताप व्यक्त केल्याचे व्हिडिओमध्ये दिसत आहे.
कारचालकाने कार मागे घेतल्यावर बिबट्याने कारवरच हल्ला केला. ही घटना नाशिक पुणे महामार्गावर संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी घाटात काल सकाळी घडली. बिबट्याने कार हल्ला या घटनेचा अंगावर काटे आणणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे. बिबट्याने हल्ला केल्यानंतर याठिकाणाहून पलायन केले. दरम्यान, कारने बिबट्याला दिलेल्या धडकेत बिबट्याचे प्राण वाचले आहेत. तर कारचालकही येथून पुढील प्रवासासाठी निघून गेला.