म्युकरमायकोसिसवर आजाराच्या
उपचारांसाठीचे दर निश्चित
केंद्र सरकारच्या निर्देशांनुसार राज्य सरकारने म्युकरमायकोसिसला साथरोग कायद्यांतर्गत साथीचा रोग म्हणून समाविष्ट केलं असून त्यानुसार निदानपद्धती आणि उपचारपद्धतींसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार आता राज्य सरकारला मिळाले आहेत. या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून राज्यभरात म्युकरमायकोसिसवर उपचार देणाऱ्या रुग्णालयांना या आजाराच्या उपचारांसाठीचे दर निश्चित करून दिले आहेत. निश्चित दरांपेक्षा जास्त दर कोणत्याही रुग्णालयाला आकारता येणार नाहीत.
तर व्हॉट्सअॅप खातं
कायमस्वरूपी बंद केलं जाईल
व्हॉट्सअॅपने त्याच्या प्रश्न विभागात काही प्रश्नांची उत्तर दिली आहेत. त्यामुळे गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी न वापरली जाणारी खाती काही कालावधीनंतर निष्क्रीय केली जातील असं सांगितलं आहे. या कालावधीत व्हॉट्सअॅपचा वापर न केल्यास तो कालावधी यासाठी ग्राह्य धरला जाईल आणि त्यानंतर व्हॉट्सअॅप खातं कायमस्वरूपी बंद केलं जाईल. खातं निष्क्रिय करण्यासाठी अटी असणार आहेत. एक तर खातं कायमस्वरूपी बंद केलं जाईल आणि त्याचा पूर्ण डेटा सर्व्हरमधून कायमस्वरूपी डिलीट केला जाईल.
अमेरिकी डॉलर वधारला,
सोन्याच्या दरात घसरण
अमेरिकेच्या मजबूत आर्थिक आकडेवा अमेरिकेच्या चलनाला बळ मिळाले. परिणामी डॉलरचे वर्चस्व असलेल्या धातूंचे आकर्षण कमी झाले असल्याचे एंजेल ब्रोकिंग लिमिटेडचे गैर कृषी वायदा व चलन संशोधन उपाध्यक्ष प्रथमेश माल्या यांनी सांगितले. कालच्या व्यापारी सत्रात, स्पॉट गोल्डे दर २ टक्क्यांनी घसरले व ते १८७०. ६ डॉलर प्रति औसांवर स्थिरावले. कारण अमेरिकेची दमदार आर्थिक आकडेवारी नोंदवली गेल्याने अमेरिकी चलनालाही बळकटी मिळाली. त्यामुळे सोन्याचे आकर्षण कमी झाले.
वर्षभरात करोना प्रतिबंधक
लस तयार करुन देश आत्मनिर्भर
देशातल्या वैज्ञानिक आणि संशोधकांच्या कामगिरीमुळे देश प्रत्येक क्षेत्रात पुढे आहे. वर्षभरात करोना प्रतिबंधक लस तयार करुन देश आत्मनिर्भर झाल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. Council of Scientific and Industrial research च्या आज झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी वैज्ञानिक आणि संशोधकांनी करोनाविरुद्धच्या लढ्यात दिलेल्या योगदानाविषयी त्यांचं कौतुक केलं.
तिसरी लस एक ऑगस्टपासून
उपलब्ध होणार
भारतीयांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. कोरोना प्रतिबंधक लसीची मोठी प्रतिक्षा असंख्य नागरिकांना आहे. आणि आता ऑगस्ट महिन्यापासून भारतीय बनावटीची आणखी एक लस येणार आहे. त्यामुळे कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन पाठोपाठ आता तिसरी लस सर्वांसाठी उपलब्ध होणार आहे. कोरोनावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव मार्ग असल्यामुळे देशात लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण व्हावे याचे प्रयत्न सुरू आहेत.
लस घेणाऱ्यांना बीअर
मोफत देण्याची घोषणा
लसीकरणाला प्रतिसाद मिळावा म्हणून गल्लोगल्ली ऑटो-रिक्षा फिरताना आपण बघतो. चौकाचौकांमध्ये सिग्नलवरील घोषणा आपण ऐकतो. जनजागृतीचे हेच माध्यम आपण आजवर बघत आलो आहोत. मात्र अमेरिका सरकारने लस घेणाऱ्यांना बीअर मोफत देण्याची घोषणा करून साऱ्या जगाचे लक्ष वेधले आहे. जगभरात कोरोनाचा कहर थांबलेला नाही. दररोज लाखो लोकांना संक्रमण होत आहे. लस घेण्यासाठी पुढे येण्याचे प्रमाण पाहिजे त्या प्रमाणात कमीच आहे.
ज्येष्ठ नागरिकांसाठी सरकारची
सेझ नवीन योजना
देशात ज्येष्ठ नागरिकांची संख्या एकूण लोकसंखेच्या सरासरी १० टक्क्यांपेक्षा कमी होती, परंतु तीस वर्षानंतर ज्येष्ठ नागरिकांची संख्या देशात सरासरी २० टक्क्यांपेक्षा जास्त होणार आहे. केंद्र सरकारने आता त्यांच्याशी संबंधित सुविधा व उत्पादने सहज उपलब्ध करुन देण्यास सुरवात केली आहे. विशेष म्हणजे, ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित हे पाऊल त्यांच्या वेगाने वाढणाऱ्या लोकसंख्येच्या दृष्टीने उचलले गेले आहे. संदर्भात सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने सेझ (सीनियर केअर एजिंग ग्रोथ इंजिन) नावाची एक नवीन योजना तयार केली आहे.
मध्य प्रदेशमध्ये
सर्वाधिक मुले अनाथ
कोरोनामुळे अनेक मुलांच्या डोक्यावरून आई-वडिलांचे छत्र गेल्यामुळे ती निराधार झाली आहेत. अशा मुलांच्या मदतीसाठी आता केंद्रासह राज्य सरकारे सरसावली आहेत. देशात ८ ते १३ वयोगटातील मुलांवर सर्वाधिक परिणाम झाल्याचे चित्र आहे. केंद्राच्या बाल स्वराज्य या ऑनलाईन ट्रॅकिंग पोर्टलद्वारे ही सर्व आकडेवारी स्पष्ट झाली आहे. आकडेवारीनुसार, मध्य प्रदेशमध्ये सर्वाधिक अनाथ मुले आहेत.
वसई विरार महापालिकेचे
आयुक्त प्रेमसिंग जाधव बेपत्ता
वसई विरार महापालिकेचे आयुक्त प्रेमसिंग जाधव बेपत्ता झाल्याने शहरात सध्या खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवासंपासून प्रेमसिंग जाधव बेपत्ता आहेत. याप्रकरणी पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार करण्यात आली असून तपास सुरु कऱण्यात आला आहे. प्रेमसिंग जाधव यांच्याकडे कोरना रुग्णांच्या मृतदेहांची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी होती. जाधव अचानक बेपत्ता झाल्याने तर्क-वितर्क लढवले जात आहेत.
व्हॉट्सअपवर कोव्हिड १९ रुग्णांवर
एक्सरेसेतू हा नवा उपाय
आर्टपार्क (एआय अँड रोबोटिक्स टेक्नोलॉजी पार्क) ने या आघाडीवर एक्सरेसेतू लाँच करून उपाय शोधून काढला आहे. आर्टपार्कमधील एआय संशोधकांनी हेल्थटेक स्टार्टअप निरामई आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्ससोबत भागीदारी करत व्हॉट्सअपवर छातीच्या एक्सरेच्या स्पष्टीकरणानुसार भारतभरातील कोव्हिड १९ रुग्णांवर लवकर उपचारासाठी एक्सरेसेतू हा नवा उपाय विकसित केला आहे.
सर्वोच्च न्यायालयात पूर्वीसारखी
फिजिकल सुनावणी सुरू व्हावी
सर्वोच्च न्यायालयाच्या वरिष्ठ न्यायाधीशांनी एका सुनावणीदरम्यान देवाजवळ प्रार्थना केली. ते म्हणाले, लवकरात लवकर सर्वांचे लसीकरण व्हावे, जेणेकरून सर्वोच्च न्यायालयात पूर्वीसारखी फिजिकल सुनावणी सुरू व्हावी आणि न्यायालय पुन्हा सुरू व्हावे. न्यायालयाने एका जामीन अर्जावर सुनावणी करत होते. याचिकाकर्त्याच्या टिप्पणीवर प्रतिक्रिया देताना न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे पीठ म्हणाले, की पुढच्या वेळी या प्रकरणाची सुनावणी होताना सर्व लोक आमने सामने उभे रहावे. मार्च २०२० पासून सर्वोच्च न्यायालयात व्हर्च्यूअल माध्यमाद्वारे सुनावणी सुरू आहे.
कुस्तीपटू सुमित मलिक
डोप टेस्टमध्ये फेल
टोक्यो ऑलिम्पिक आधीच भारताच्या आशांना मोठा धक्का बसला आहे. कुस्तीपटू सुमित मलिक डोप टेस्टमध्ये फेल झाला आहे. त्याच्यावर बंदी घातलेला पदार्थाचे सेवन केल्याचा आरोप आहे. अँटी डोपिंगच्या नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने या कुस्तीपटूला सध्या निलंबित केले आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाने याची पुष्टी केली आहे.
अल्लाह समोर रडून माफी
मागितल्यास हे संकट संपेल
उत्तर प्रदेशमधील मुरादाबादमधील समाजवादी पक्षाचे खासदाराने अशाच पद्धतीचं वक्तव्य केलं आहे. संभलचे समाजवादी खासदार शफीकुर्रहमान बर्क यांनी केलेल्या वक्तव्यावरुन वाद निर्माण झालाय. करोना काही आजार नाहीय. करोना जर आजार असता तर जगात त्यावरील उपाय असता. करोेनाचे संकट हे सरकारच्या चुकीच्या निर्णयांमुळे आलेलं अजाब ए इलाही (संकट) आहे. अल्लाह समोर रडून माफी मागितल्यास हे संकट संपेल, असं शफीकुर्र रहमान म्हणालेत.
बियाणे बोगस निघाल्यास
उत्पादकांवर कारवाई
सध्या खरीप हंगामाची तयारी सुरू आहे. शेतकऱ्यांना दर्जेदार बियाणे योग्य दरात उपलब्ध होण्यासाठी शासनाचे प्रयत्न आहेत. बोगस बियाणे किंवा उगवण न होणारे बियाणे शेतकऱ्यांना विक्री झाल्यास संबंधित बियाणे उत्पादक कंपन्यांवर कारवाई करा, असे निर्देश पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिले.
अमेरिकेने २८ चिनी कंपन्यांना
टाकले काळ्या यादीत
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी आणखी २८ चिनी कंपन्यांना अमेरिकन गुंतवणूकदारांसाठी काळ्या यादीत टाकले आहे. बीजिंगच्या “लष्करी-औद्योगिक परिसरा”शी जोडल्या गेलेल्या अमेरिकन गुंतवणूकदारांसाठी मर्यादीत चीनी कंपन्यांच्या काळ्या सूचीची यादी गुरुवारी वाढवण्यात आली. व्हाइट हाऊसने ही माहिती दिली आहे.
SD social media
9850 60 3590