शेगाव संस्थानचे विश्वस्त
शिवशंकर पाटील यांची प्रकृती स्थिर
मागील तीन दिवसांपासून मल्टीऑर्गन फेल्युअरमुळे श्री संत गजानन महाराज शेगाव संस्थानचे विश्वस्त शिवशंकर भाऊ पाटील यांची प्रकृती अत्यवस्थ झालीय. मात्र त्यांनी ‘मला कुठल्याही दवाखान्यात हलवू नका..’ असं सांगितलं असल्याने त्यांच्यावर घरीच डॉ. हरीश सराफ यांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. शिवशंकरभाऊ यांच्यावर त्यांच्या राहत्या घरीच पूर्ण मेडिकल सेटअपसहीत उपचार सुरू आहेत. त्यांचा रक्तदाब कमी झालेला असून त्यांना कृत्रिम ऑक्सिजनचा पुरवठा केला जातोय.
पुढील आठवड्यापासून नव्या
रुग्णांची संख्या वाढणे सुरू होईल
कोरोना महामारीची तिसरी लाट येणे जवळपास निश्चित झाल्याचे मानले जात आहे. पुढील आठवड्यापासून नव्या रुग्णांची संख्या वाढणे सुरू होईल, असे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. परंतु तिसरी लाट ही दुसऱ्या लाटे इतकी धोकादायक नसेल. तिसऱ्या लाटेत अति प्रतिकूल परिस्थितीतही दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत एक चतुर्थांश असेल. दुसऱ्या लाटेच्या गंभीरतेबाबत भविष्यावाणी करणारे कानपूर आयआयटीचे संशोधक मणिंद्र अग्रवाल सांख्यिकी मॉडेलच्या सूत्राच्या आधारावर हा दावा केला आहे..
अटकेच्या भीतीने माजी गृहमंत्री
अनिल देशमुख गायब
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख ईडीनं बजावलेल्या चौथ्या समन्सनंतर देखील सोमवारी चौकशीला गैरहजर राहिले. त्यामुळे अनिल देशमुख नेमके कुठे गायब झाले आहेत ? असा प्रश्न ED ला पडला आहे. यासंदर्भात आता ईडीला सर्वोच्च न्यायालयाकडून आज दिल्या जाणाऱ्या आदेशांची प्रतीक्षा असून “अनिल देशमुख नेमके कुठे आहेत, याची आम्हाला माहिती नाही”, असं ईडीचं म्हणणं आहे. त्यामुळे आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी नेमकी अनिल देशमुख यांची चौकशी होणार का? आणि झाली, तर ती कधी होणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
राहुल गांधी यांच्या ब्रेकफास्ट पार्टीत
१४ प्रमुख विरोधी पक्षांचे नेते उपस्थित
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ब्रेकफास्ट पार्टी दिल्लीत आज चांगलीच चर्चेत राहिली. कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये झालेल्या या पार्टीत १४ प्रमुख विरोधी पक्षांचे नेते उपस्थिती होते. या पार्टाने राहुल गांधी यांनी १०० हून अधिक खासदारांशी चर्चा केली. या पार्टीत शिवसेना, राष्ट्रवादी, तृणमल काँग्रेस, राजद यापक्षाचे नेते उपस्थितीत होते. तर बसपा व आम आदमी पार्टीचे नेते सामील झाले नव्हते. या पार्टीत महाराष्ट्रातील राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल, खा. सुप्रिया सुळे, शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत हे उपस्थितीत होते. केंद्र सरकारला संसदेत घेरण्याची तयारीसाठी ही पार्टी होती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष आक्रमक झाले आहेत. या मुद्द्यावरुन केंद्र मागणी विरोधी
राज्य सरकारची तब्बल
११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी
राज्य सरकारने मदतीसाठी मोठ्या पॅकेजची घोषणा करण्याची मागणी विरोधकांकडून सातत्याने केली जात होती. अखेर राज्य सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला असून पूरग्रस्त भागातील मदत, दुरुस्ती आणि दीर्घकालीन उपाययोजनांसाठी राज्य सरकारने तब्बल ११ हजार ५०० कोटींच्या पॅकेजला मंजुरी दिली आहे. आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. यात घर पूर्ण नष्ट झालेल्यांना दीड लाख तर दुकान पूर्णपणे नष्ट झालेल्यांसाठी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.
अश्लील चित्रपट बनवून प्रसारित करत
असल्यामुळेच कुंद्राला अटक
बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा अश्लील चित्रपटासंदर्भातील पुरावे नष्ट करत होता. अश्लील चित्रपट बनवून ते अॕपवर प्रसारित करत असल्यामुळेच त्याला अटक करावी लागली, असे सरकारी वकिलांनी उच्च न्यायालयात सांगितले. राज कुंद्राने अटकेविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी झाली. त्यादरम्यान सरकारी वकिलांनी त्याच्या अश्लील चित्रपटाच्या व्यवसायाबाबतची माहिती उघड केली. उच्च न्यायालयाने सुनावणी पूर्ण करून निर्णय राखीव ठेवला आहे. या प्रकरणावर निर्णय नंतर जाहीर करणार आहे.
लसीकरण पूर्ण करण्यात
कोवॅक्सिन लशीचा अडथळा
या वर्षाअखेरपर्यंत संपूर्ण देशात सगळ्या लोकांचे लसीकरण करवून घेण्याचे लक्ष्य केंद्र सरकारने ठेवले आहे. परंतु भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लशीचा तुटवडा या लक्ष्यामध्ये अडथळा ठरण्याची शक्यता आहे. बंगरुळूमधील कंपनीच्या नव्या प्लँटमध्ये उत्पादित लशीची गुणवत्ता कमी आढळल्याचे प्रमुख कारण मानले जात आहे. ही माहिती टास्कफोर्सचे सदस्य डॉ. एन. के. अरोरा यांनी दिली.
पुरुष हॉकी संघाने त्यांची
सर्वोत्तम खेळी केली : पंतप्रधान
भारतीय हॉकी संघाचा ५-२ अशा फरकाने बेल्जियमने पराभव केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी संघाचं कौतुक केले आहे. त्यामुळे या पुरुष हॉकी टीमचे मनोबल उंचावणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने त्यांची सर्वोत्तम खेळी केली असून आपल्या दृष्टीने तेच महत्वपूर्ण आहे. त्यांनी संघाला आगामी सामन्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा दिल्या. आपली ट्विट संदेशात पंतप्रधान म्हणाले; जय आणि पराभव हे जीवनाचे भाग आहेत टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये आपल्या पुरुष हॉकी संघाने त्यांची सर्वोत्तम खेळी केली आणि तेच महत्त्वाचे आहे. संघाला आगामी सामन्यासाठी आणि त्यांच्या भविष्यातील प्रयत्नांसाठी शुभेच्छा.
SD social media
9850 60 3590