कोरोना विषाणूच्या प्रकरणांमुळे
संपूर्ण जगाची चिंता वाढली
चीनसह अनेक देशांमध्ये कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांमुळे संपूर्ण जगाची चिंता वाढली आहे. भारतातही तज्ज्ञ चौथ्या लाटेचा अंदाज व्यक्त करत आहेत. युरोप आणि दक्षिण-पूर्व आशियामध्ये कोरोनाचा वेग पुन्हा वाढला आहे. चीनमध्ये 14 महिन्यांनंतर कोरोनाने दोघांचा बळी घेतला आहे. त्याच वेळी, हाँगकाँगमध्ये कोरोनाची एकूण प्रकरणे 10 लाखांच्या पुढे गेली आहेत, त्यापैकी 97% प्रकरणं कोरोनाच्या आताच्या लाटेत समोर आली आहेत. या ठिकाणी कोरोनाने आतापर्यंत 5,401 लोकांचा बळी घेतला आहे. 2019 मध्ये चीनमध्ये संसर्गाचा उद्रेक झाल्यापासून (4,636) ही मृत्यू संख्या जास्त आहे.
मोहन भागवतांच्या नावापुढे
खान जोडणार आहात का?
अफजल गुरुला फाशी देऊ नको म्हणणाऱ्या मेहबुबा मुफ्तीसोबत सत्तेसाठी मांडीघाशी केली तितका निर्लज्जपणा शिवसेनेत येणं शक्य नाही. मी तो कदापि येऊ देणार नाही. सत्ता मिळत असली तरी एमआयएमसोबत जाणार नाही,” असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना मुस्लीमधार्जिणी झाल्याचं म्हणत आहेत. मी मोहन भागवत यांची वाक्यं घेऊन बसलो आहे. जर मला जनाब म्हणणार असाल तर सरसंघचालकांना काय बोलणार आहात? भागवतांच्या नावापुढे खान किंवा जनाब जोडणार आहात का? आधी हिंदुत्व काय ते समजून घ्या,” असं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. तुमची सत्तेची स्वप्नं आम्ही चिरडून टाकली म्हणुन आम्ही मुस्लीमधार्जिणी असू तर मोहन भागवतांनी काय सांगितलं आहे ते ऐका असं सांगत उद्धव ठाकरेंनी त्यांची काही वक्तव्यं वाचून दाखवली.
चादर चढवताना आपला
स्वाभिमान झुकला नाही का?
शिवसेना प्रवक्त्या आणि आमदार मनिषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली आहे. मनिषा कायंदे यांनी देवेंद्र फडणवीसांचा फोटो ट्वीट करत आताच जनाब या शब्दाबद्दल एवढा राग? का असा सवाल केला आहे. जनाब देवेंद्र फडणवीसजी, तेव्हा तुम्ही जनाब शब्दाबद्दल आक्षेप घेतल्याचे आठवत नाही. चादर चढवताना आपला स्वाभिमान वाकला/झुकला नाही का? आताच का या शब्दाबद्दल एवढा राग? अरे हो, १०५ आमदार निवडूनही भाजपा सत्तेत नाही, यामुळे तुमची अस्वस्थता आहे. नाही का?,” असे टीका मनिषा कायंदे यांनी केली आहे.
दिशाहिन पक्ष म्हणजे
शिवसेना : नारायण राणे
शिवसेनेला तत्व किंवा धोरण नाही. दिशाहिन पक्ष म्हणजे शिवसेना,” अशी प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी टिव्ही ९ सोबत बोलताना दिली आहे. माजी मंत्री गिरीश महाजन यांच्या मुलीच्या लग्नासाठी नारायण राणे जामनेर येथे आले होते.
संत तुकाराम महाराजांचा
बिजोत्सव भक्तिभावाने साजरा
पुण्याच्या देहूत जगतगुरु संत तुकाराम महाराजांचा बिजोत्सव पार पडत आहे. गेल्या दोन वर्षांपासून करोनामुळं बिजोत्सवावर अनेक निर्बंध होते. परंतु, यावर्षी करोना आटोक्यात आल्याने वारकऱ्यांना देहूत प्रवेश देण्यात आला असून ‘याची देही, याची डोळा’ हा सोहळा पाहण्यास मिळत आहे. देहू नगरी ग्यानबा तुकारामाच्या गजराने दुमदुमून गेली असून ३७४ वा सदेह वैकुंठगमन सोहळा पार पडत आहे. दोन वर्षांनंतर देहूनगरीत जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा सदेह वैकुंठ गमन सोहळा म्हणजेच बिजोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होत आहे.
जम्मू काश्मीरमध्ये जे झालं
त्याला पाकिस्तान जबाबदार
गुलाम नबी आझाद यांनी जम्मू काश्मीरमध्ये जे झालं त्याला पाकिस्तान आणि दहशतवादाला जबाबदार धरलं आहे. जम्मूमध्ये बोलताना गुलाम नबी आझाद म्हणाले, “मला वाटतं की महात्मा गांधी हे एक महान हिंदू आणि धर्मनिरपेक्षतावादी व्यक्तिमत्तव होते. जम्मू काश्मीरमध्ये जे झालं त्याला पाकिस्तान आणि दहशतवाद जबाबदार होता. त्यामुळे सर्वच हिंदू, काश्मिरी पंडित, काश्मिरी मुस्लीम आणि डोग्रा जमातीलाही कष्ट भोगावे लागले. “
हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या
न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी
हिजाब प्रकरणी निकाल देणाऱ्या कर्नाटक उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. सरन्यायाधीश ऋतुराज अवस्थी यांना आता वाय दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या दोन आरोपींना तामिळनाडू पोलिसांनी शनिवारी अटक केली आहे. तिरुनेलवेली येथे कोवई रहमतुल्लाला अटक करण्यात आली, तर ४४ वर्षीय एस जमाल मोहम्मद उस्मानी याला तंजावरमध्ये ताब्यात घेण्यात आले.
पाकिस्तानमधील सियालकोट येथे
लष्कराच्या भागात मोठा स्फोट
पाकिस्तानमधील सियालकोट येथे लष्कराच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात मोठा स्फोट झाला आहे. या स्फोटाचे काही व्हिडीओ समोर आले आहेत.
पाकिस्तानी लष्कर या स्फोटाची पुष्टी करत आहे. तर उर्दू दैनिक द डेली मेलने या स्फोटाबद्दल सांगताना “सियालकोट येथील लष्करी तळावर मोठा स्फोट झाला आहे. दारुगोळा ठेवलेल्या ठिकाणी हा स्फोट झाल्याची माहिती मिळतेय. स्फोटानंतर या भागात आग लागली असून स्फोटाचे नेमके कारण समोर आलेले नाही,” असं ट्विटच्या माध्यमातून सांगितलं आहे.
फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी
लोकांवर गॅलरी कोसळली
फुटबॉलचा सामना पाहण्यासाठी आलेल्या शेकडो लोकांवर गॅलरी कोसळल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वंदूर जिल्ह्यातील मलाप्पूरम येथील पुंगूड येथे हा अपघात घडलाय. या घटनेत तब्बल २०० लोक जखमी झाले असून यामध्ये पाच जणाची प्रकृती गंभीर आहे. शनिवारी रात्री ९ वाजता ही घटना घडल्याची माहिती पोलिसांनी दिलीय. या घटनेचा व्हिडीओ समोर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार केरळ राज्यातील मलाप्पूरममधील पुंगुड येथे दोन संघादरम्यान फुटबॉलचा अंतिम सामना खेळवला जाणार होता.
SD social media
9850 60 35 90