जंगलांचं संरक्षण आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. वनांशिवाय मानवी जीवनाची कल्पना करता येत नाही. वनाच्या संरक्षणासाठी लोकांना जागृत करण्याच्या दृष्टीनं जागतिक वनदिन साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्रसंघाच्या अन्न व शेती संघटनेच्या सदस्य देशांनी हा वर्ल्ड फॉरेस्ट डे साजरा करण्यास सुरुवात केली. 28 नोव्हेंबर 2012 साली संयुक्त राष्ट्र महासभेत 21 मार्चला जागतिक वनदिन साजरा करण्यासाठी प्रस्ताव पारित करण्यात आला.
जगभरात सर्व प्रकारच्या वनांच्या बाबतीत लोकांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मध्यंतरी मोठ्या प्रमाणात वनांची कत्तल झाली. आता सरकारनं कडक कायदे बनविलेत. त्यामुळे वनांच्या कत्तलीचं प्रमाण कमी झालंय. तरीही चोरटी वनकत्तल काही प्रमाणात सुरूच आहे.
जगात 1.6 बिलीयन लोकांचे जीवन जंगलांवर अवलंबून आहे. जेवण, घर आणि औषधांसाठी जंगलावर अवलंबून राहावे लागते. जगभरात दरवर्षी सुमारे 10 मिलीयन हेक्टर जंगल लावलं जातं. हेच वायू परिवर्तनाचे मुख्य कारण आहे. संयुक्त राष्ट्रानुसार आपण 25 टक्के औषधी वनांपासून मिळते.
न्यूयार्क, टोकियो, बार्सिलोना आणि बोगोटा सारख्या काही शहरांत पिण्याच्या पाण्यासाठी वन संरक्षणावर भर दिला जात आहे. शुद्ध हवा, पिण्याचे पाणी आपल्याला मिळतात ते वनांमुळं. बदलत्या हवामानावर भविष्यात चिंता व्यक्त होत आहे. संयुक्त राष्ट्रानं दिलेल्या माहितीनुसार, 60 टक्के संसर्गजन्य आजार प्राण्यांच्या संपर्कातून पसरतात. जंगलतोडीमुळं प्राण्यांकडून विषाणू मानवाच्या संपर्कात येतात. सध्या मानव व प्राणी यांचा संघर्ष वाढताना दिसून येतो. याचे कारण अवैध वृक्षतोडीत दिसून येते.