आयपीएल 2023 मध्ये मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यात सामना खेळवण्यात आला. या सामन्यात मुंबईने दिल्लीचा पराभव करून सामन्यात विजय मिळवला आहे. मुंबईने दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सने पराभव केला असून यासह आयपीएल 2023 मधील त्यांचं विजयाचं खात उघडलं आहे.
दिल्ली कॅपिटल्सच होम ग्राउंड असलेल्या अरुण जेटली स्टेडियमवर मुंबई इंडीयन्स विरुद्ध दिल्ली कॕपिटल्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईच्या गोलंदाजांनी देखील कर्णधाराचा निर्णय योग्य ठरवत दिल्ली विरुद्ध उत्कृष्ट गोलंदाजीच प्रदर्शन केलं. दिल्ली कॅपिटल्सकडून फलंदाजीसाठी मैदानात कर्णधार डेविड वॉर्नर आणि पृथ्वी शॉ यांनी एंट्री केली. परंतु चौथ्या ओव्हरमध्येच 15 धावा करून पृथ्वी बाद झाला. दिल्लीकडून डेविड वॉर्नरने 51, मनीष पांडेने 26, अक्षर पटेलने 54 धावांचे योगदान दिले. तर दिल्लीच्या इतर फलंदाजांना दोन अंकी धाव संख्या करता आली नाही.
मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांपैकी पियुष चावला आणि जेसन बेहरेनडॉर्फ यांनी प्रत्येकी 3 विकेट घेतल्या. तर रिले मेरेडिथने 2 आणि रितिका शौकीनने 1 विकेट घेतली. दिल्ली कॅपिटल्सने 10 विकेट्स गमावून 172 धावा केल्या. दरम्यान मुंबई इंडियन्सला विजयासाठी 173 धावांचे आव्हान मिळाले असताना कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन यांची जोडी ओपनिंगसाठी मैदानात आली. यात आठव्या ओव्हरमध्ये दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजाला ईशान किशनची विकेट घेण्यात यश आले. परंतु त्यानंतर कर्णधार रोहितने मैदानावर चौफेर फटकेबाजी करण्यास सुरुवात केली. रोहितने आयपीएल कारकिर्दीतील त्याचे 41 वे अर्धशतकं ठोकले. तर टिलक वर्माने 23 चेंडूत 41 धावा केल्या. मुंबई विरुद्ध दिल्लीची मॅच शेवटच्या ओव्हरपर्यंत अत्यंत रोमांचक ठरली. अखेर कॅमेरून ग्रीन आणि टीम डेविड या दोघांनी अखेरच्या ओव्हरमध्ये मुंबईकडे विजय खेचून आणला.