यंदाच्या आयपीएल हंगामाचे अधिकृत डिजिटल स्ट्रिमिंग पार्टनर जिओ सिनेमा आहे. हंगामाच्या पहिल्याच आठवड्यात जिओ सिनेमावर प्रेक्षकांनी विक्रमी उपस्थिती नोंदवली. पहिल्याच आठवड्यात विकेंडला प्रेक्षकांच्या संख्येने गेल्या वर्षीच्या आयपीएल आणि आयसीसी टी२० वर्ल्ड कपच्या प्रेक्षक संख्येचा विक्रम मोडला.
प्रेक्षकांचा विचार करून जिओ सिनेमाने सामन्याचे प्रक्षेपण करताना काही फीचर्स दिली आहेत. यामुळे चाहत्यांच्या सामना पाहण्याच्या वेळेतही वाढ झाली आहे. प्रत्येक प्रेक्षक सरासरी ५७ मिनिटे सामना पाहत असल्याचं नोंद झालंय. गेल्या वर्षी पहिल्या विकेंडला नोंदवलेल्या सामना पाहण्याच्या सरासरी वेळेच्या तुलनेत यावेळी ६० टक्के वाढ झाली आहे. जिओ सिनेमावर सुरवातीच्या आठवड्यातच १४७ कोटी व्ह्यूज झाले आहेत.