पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी मुंबईत वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. यानंतर मोदींनी मुंबईतील मरोळमधील दाऊदी बोहरा समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. त्यांनी अल जामिया तूस सैफियाह सैफ अकादमीच्या एका कॅम्पसचे उद्घाटन केले. कार्यक्रमात बोलताना मोदींनी बोहरा समाजाने वेळोवेळी स्वत:ला सिद्ध केलंयअशा शब्दात कौतुक केलं.
बोहरा समाजाकडून मला प्रेम मिळालं आणि आजही ते अबाधित आहे. परदेशात गेलो तरी बोहरा बांंधव भेटतात. बोहरा समाजामुळे गांधीजींचं स्मारक झाल्याचंही नरेंद्र मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदींनी यावेळी बोलताना म्हटलं की, बोहरा समुदायाशी माझं खूप जुनं नातं आहे. माझ्यासाठी हे कुटुंबात आल्यासारखं आहे. मी तुमच्या कुटुंबाचा सदस्य आहे. मी चार पिढ्यांपासून या बोहरा समुदयाशी जोडलेल्या आहेत. असं सौभाग्य खूप कमी लोकांना मिळतं. जेव्हा इथे येण्याची संधी मिळते तेव्हा माझा आनंद अनेक पटींनी वाढला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी याआधीही अनेकदा बोहरा समुदायाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. याआधी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत म्हटलं होतं की, पसमांदा, बोहरा मुस्लिम समुदयांपर्यंत पोहोचण्याचं तेव्हा आवाहन केलं होतं. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मुंबई दौरा हा बीएमसी निवडणुकीशी जोडला जात आहे.