मुंबई महापालिकेची निवडणूक लवकरच होणार? या 5 गोष्टींनी वाढले संकेत

देशाची आर्थीक राजधानी म्हणून मुंबईची ओळख आहे. दरम्यान आगामी काळात मुंबई महापालिकेच्या निवडणूका होणार आहेत. मुंबई महापालिकेच्या निवडणुकांमध्ये शिवसेना आणि भाजप अशी थेट लढत होणार असली तरी या निवडणूकीमध्ये मुंबई महापालिकेत मेट्रो, मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन, वंदे भारत योजना, तसेच मुंबईत पाऊस पडल्यानंतर होणारे रस्ते ब्लॉक या सगळ्यां मुद्द्यांवर मुंबईची निवडणूक होणार असल्याचे दिसून येत आहे.

1) मुंबई महापालिका निवडणुकीत वंदे भारत योजना प्रभावी ठरणार का?

वंदे भारत योजनेअंतर्गत महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईला बहुतेक जिल्ह्यांना जोडण्याची योजना आखण्यात आली आहे. सोलापूर -मुंबई, नाशिक- शिर्डी- मुंबई, पुणे -मुंबई अशा प्रमुख शहरांना वंदे भारत योजनेअंतर्गत जोडले जाणार आहे. याचा फायदा मुंबईकरांसह जोडणाऱ्या शहरांना होणार आहे. वंदे भारत योजनेतून भाजप आणि शिंदे सरकार मुंबईतील नागरिकांना जोडत जरी असले तरी याचा फायदा आगामी महापालिका निवडणूकीत भाजप आणि शिंदे सरकारला होतो हे पाहणे महत्वाचे आहे.

2) मुंबईतील मेट्रोचे जाळे नागरिकांच्या फायद्याचे ठरणार?

मागच्या काही वर्षांपासून मुंबईत मेट्रोचे जाळे जोरदार पसरले आहे. दरम्यान मुंबईत होणाऱ्या मेट्रोच्या कार शेडवरून महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये जोरदार खंडाजंगी सुरू आहे. आरेचे जंगल तोडून मेट्रोचे कारशेड बांधण्यावरून जोरदार वाद झाला होता. महापालिकेच्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून भाजप आणि शिंदे सरकारने मुंबई मेट्रो लाईन 2A आणि 7 चे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केले. हा मेट्रो मार्ग सुमारे 12,600 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आला आहे.

3) मुंबई, अहमदाबाद बुलेट ट्रेनचा फायदा कोणाला?

मुंबई अहमदाबाद बुलेट ट्रेन हा देशातील पहिलाच महत्त्वाकांक्षी प्रकल्प आहे. जानेवारी 2029 पर्यंत या प्रकल्पासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. तर 2026 सालापर्यंत बुलेट ट्रेनचा 50 किलोमीटरचा प्रकल्प पूर्ण करण्याचं उद्दीष्ट रेल्वे मंत्रालयाने ठेवले आहे. मात्र हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनेक आव्हानांचा सामनाही करावा लागणार आहे. दरम्यान या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदे सरकार उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधण्याची शक्यता आहे. केंद्राकडून भरघोस निधी हे सरकार आणून मुंबईकरांची मने जिंकण्याच्या प्रयत्नात आहेत.

4) मुंबईची पावसाळ्यात होणारी तुंबई

प्रत्येक वर्षाी मुंबईत जुलै आणि ऑगस्ट महिन्यात पाऊस झाला की रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचते यामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होते. या सर्वात मोठा फटका मुंबई काम करणाऱ्या लोकांवर होतो. आगामी काळातील निवडणूकीत भाजप आणि विरोधक मुंबई महापालिकेत असलेल्या सत्ताधारी शिवसेनेवर निशाणा साधण्याची शक्यता आहे. यंदाच्या पावसातही मोठ्या प्रमाणात मुंबईकरांचे हाल झाले होते. यामुळे विरोधकांसह सत्ताधाऱ्यांच्या जाहिरनाम्यात हा मुद्दा महत्वाचा असणार आहे.

5) मुंबई महापालिकेत महाविकास आघाडी चालणार का?

विधानपरिषदेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढली आणि या निवडणुकीत त्यांना मोठे यश देखील मिळाले. मात्र येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत गणिते बिघडू शकतात, कारण अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीत चलबिचल झाल्याची उदाहरणे आहेत. मुंबई काँग्रेसचे नवनिर्वाचित अध्यक्ष भाई जगताप यांनी येणाऱ्या महापालिका निवडणुकीत स्वबळाचा नारा दिला आहे. 2017 साली झालेल्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना स्वतंत्र लढले होते. मात्र येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीत भाजप विरुद्ध तीन पक्ष आहेत. त्यामुळे याचा भाजपला फायदा होणार की तोटा हे येणारा काळच ठरवणार आहे.

मुंबई महापालिकेत एकूण 227 जागा आहेत. त्यापैकी शिवसेनेकडे 92 जागा, भाजप 82 जागा, काँग्रेस 31 तर राष्ट्रवादी काँग्रेसकडे 9 जागा आहेत. 2017 ला झालेल्या निवडणुकीत राज्यात भाजप – शिवसेना युती असली तरी देखील मुंबई महानगर पालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष वेगवेगळे लढले. पण निवडणुकीनंतर शिवसेनेला बहुमतासाठी भाजपने पाठिंबा जाहीर केला. पण आता राज्याचे राजकीय गणित बदलले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.