शिवसेनेच्या या 16 आमदारांचं टेन्शन वाढलं! मंगळवारी सुप्रीम कोर्टात काय होणार?
उद्धव ठाकरे आणि शिंदे गटाची उद्या 10 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयासह निवडणूक आयोगात परीक्षा पार पडणार आहे. सर्वोच्च न्यायालयात 16 आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात उद्या सुनावणी होणार आहे. तर निवडणूक आयोगात शिवसेनेचं निवडणूक चिन्हं धनुष्यबाण दोनही गटापैकी कोणाला मिळणार या संदर्भात पहिल्यांदाच देशाच्या निवडणूक आयोगात प्रत्यक्ष सुनावणी पार पडणार आहे.उद्या होणाऱ्या सुनावणीत दोन्ही गटाने जे कागदपत्र सादर केले आहेत त्यावर शंका घेणारे अर्ज सादर करण्यात आले आहेत. त्यावर उद्या अगोदर सुनावणी होणार आहे. आणि नंतर मूळ प्रकरणावर सुनावणी घ्यावी अशी मागणी या अर्जात करण्यात आली आहे.
‘… ही तर खेळाडूंची वैयक्तिक गोष्ट’, बीसीसीआयच्या त्या निर्णयावर भडकले गावसकर
बीसीसीआयने काही दिवसांपूर्वीच भारतीय संघात निवडीसाठी खेळाडूंना यो-यो चाचणी आणि डेक्सा स्कॅन अनिवार्य केले होते. या दोन्ही चाचणीत पात्र ठरणाऱ्या खेळाडूंनाच भारतीय संघात येण्याची संधी मिळणार आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. आता भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी देखील यो-यो चाचणी आणि डेक्सा स्कॅन अनिवार्य करण्यावर सडकून टीका केली आहे.सुनील गावस्कर यांनी एका वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले, अनेक वर्षांपूर्वी जेव्हा शारीरिक तंदुरुस्तीची क्रेझ सुरू झाली, तेव्हा आमच्याकडे दोन माजी संघसहकारी होते जे निवृत्त झाले आणि त्या हंगामात वेगवेगळ्या मालिकांसाठी संघ व्यवस्थापक झाले. हे दोघेही त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीत तंदुरुस्त नव्हते. याबाबत उदाहरण देताना गावसकर यांनी त्यांच्या क्रिकेट कारकिर्दीतील एक जुना किस्सा सांगितला. ते म्हणाले, माझी स्थिती माहीत असूनही संघ व्यवस्थापकाने मला धावायला सांगितले. मी 15 मिनिट धावलो आणि दमलो. मग मी त्यांना सांगितले की जर तो सर्वाधिक धावांच्या आधारे प्लेइंग-इलेव्हन निवडणार असेल तर मला वगळा.
नादच करायचा नाय! पठ्ठ्याने पाळलाय तब्बल 20 कोटींचा कुत्रा
तुम्ही अगदी हजारांपासून ते लाखो रुपये किमतीचे श्वान पाहिले असतील असतात. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल पण या डॉगची किंमत काही हजारो, काही लाख नाही तर तब्बल 20 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जातं आहे.हैदराबादच्या बंगळुरूतील सतीश एस नावाच्या व्यक्तीकडे हा श्वान आहे. डॉग ब्रीडर असलेल्या सतीशने हैदराबादच्या एका डॉग ब्रीडरकडून हा श्वान खरेदी केला होता.हा श्वान कॉकेशियन शेफर्ड या दुर्मिळ प्रजातीचा आहे. सतीश यांनी त्याचं नाव कॅडबॉम्स हैदर असं ठेवलं आहे. कॅडबॉम्स फक्त दीड वर्षांचा आहे पण तरी इतर मोठ्या श्वानांपेक्षा तो कितीतरी मोठा वाटतो.त्याचं वजन 100 किलोपेक्षाही जास्त आहे. डोकं 38 इंच आणि खांद्याची लांबी 34 इंच आहे. त्याचे पाय दोन लीटरच्या पेप्सीच्या बाटलीइतका मोठा आहे.या श्वानाने त्रिवेंद्रम केनेल क्लब स्पर्धेत भाग घेतला आणि अनेक पुरस्कार जिंकले. सर्वोत्कृष्ट श्वानाच्या या जातीसाठी कॉकेशियन शेफर्डने एकूण 32 पदके जिंकली आहेत.
बसचा भयंकर अपघात, दुर्घटनेवेळी छतावर बसले होते प्रवासी
पश्चिम बंगालच्या कटवा इथं रविवारी सायंकाळी एक भीषण अपघात झाला. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला तर किमान ४० जण यात जखमी झाले. अपघातातील जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दरम्यान, अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
पूर्व बर्दवान जिल्ह्यातील कटवा बीरभूम महामार्गावर हा अपघात झाला. अनियंत्रित झालेली बस रस्त्यावरच उलटली. धक्कादायक बाब म्हणजे काही प्रवासी बसच्या टपावर बसले होते. बस उलटताच काही जण थेट जमिनीवर पडले आणि काहीजण एसटी बसखाली सापडले. अपघातात जखमी झालेल्यांना कटवा उपविभागिय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यातील तीन लोकांची प्रकृती गंभीर आहे.
‘रोहित पवारांना एक मॅच खेळवा, 5-10 रन केले तर…’, गोपीचंद पडळकरांची बॅटिंग!
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि शरद पवारांचे नातू रोहित पवार यांची महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. रोहित पवारांच्या या निवडीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी टोला लगावला आहे. ‘पवार कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष होते, त्यांनी कुस्ती खेळली? अजितदादा कबड्डीचे अध्यक्ष त्यांनी कबड्डी खेळली का? सुप्रिया सुळे खो-खो अध्यक्ष होत्या, त्या कधी खेळल्या का? रोहित पवार क्रिकेटचा अध्यक्ष, त्याला क्रिकेट खेळता येतं का? रोहित पवारला एक मॅच खेळायला लावा, 5-10 रन केले तर, ठेवा,’ असा प्रहार पडळकर यांनी केला आहे.
‘विरोध केला नाही तर चौका चौकात…’; चित्रा वाघांचा पुन्हा उर्फीवर निशाणा
अभिनेत्री उर्फी जावेद प्रकरणात आरोप प्रत्यारोप सध्या सुरू आहेत. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फी विरोधात दाखल केलेल्या तक्रारीनंतर महाराष्ट्रातील महिला राजकारणी आमने – सामने आल्या आहेत. उर्फीचं चित्रा वाघांवर ट्विट वॉर सुरू आहे. तर चित्रा वाघ देखील पत्रकार परिषद घेत उर्फीवर निशाणा साधण्याची एकही संधी सोडत नसल्याचं पाहायला मिळत आहे. उस्मानाबाद येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी उर्फीवर पुन्हा टीका केली आहे. ‘विरोध केला नाही तर चौका चौकात नागडे नाच पाहायला मिळतील’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
चित्रा वाघ यांनी उस्मनाबाद येथून पत्रकार परिषद घेतली. तिथे बोलताना त्यांनी उर्फीवर निशाणा साधला. ‘महाराष्ट्राच्या मातीतील एका महिलेनं मला उर्फीचे इन्स्टाग्रामचे रिल्स पाठवले. मी ते पाहून हैराण झाले. माझं डोकंच फिरलं. असे नंगे नाच मुंबईत चालतात. व्यक्तिस्वातंत्र्याच्या नावाखाली नागडे नाच सुरू आहेत. आम्ही विरोध केला नाही तर मुंबईतल्या गल्ल्या गल्ल्यात असे नागडे नाच सुरू होतील’, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं.
परीक्षा जवळ तरीही ‘शिक्षक’ फायनल नाही, नागपुरात भाजप-काँग्रेसमध्ये कनफ्यूजन!
नागपूर विभाग शिक्षक मतदार संघासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची तारीख जवळ आली आहे, असं असलं तरीही भाजप आणि काँग्रेसचा उमेदवार ठरत नसल्याने दोन्ही पक्षांच्या इच्छुकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे, तर मतदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झालं आहे. भाजप-काँग्रेसने अजूनही उमेदवार निश्चित केला नसल्यामुळे राजकीय चर्चांना वेग आला आहे.
सक्तीचे धर्मांतरण चिंतेचा मुद्दा, राजकीय रंग देऊ नये; सर्वोच्च न्यायालयाने सुनावले
सक्तीच्या, फसव्या धर्मांतरणाच्या प्रकरणांवर सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. तसंच हा मुद्दा फक्त एका विशिष्ट राज्याशी निगडीत नाही. देशभरात घडणाऱ्या या घटना चिंतेच्या असल्याचं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. कोणत्याही एका राज्याशी संबंध जोडून त्याला राजकीय रंग देण्याची गरज नसल्याचंही सुप्रीम कोर्टाने नमूद केलं.सक्तीच्या धर्मांतरणावर चिंता व्यक्त करताना सर्वोच्च न्यायालयाने यात अॕटर्नी जनरल वेंकटरामानी यांनाही सहकार्य करण्यास सांगितलं आहे. यात केंद्राने प्रतिज्ञापत्र दाखल न केल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केलीय. याचिकाकर्त्याच्या वकिलांनी सांगितले की जबरदस्तने धर्मांतराच्या बाबतीत कोणताही कायदा नाही. त्यामुळे न्यायालयाने यावर कायदा करावा.
औरंगाबाद येथील ५ विद्यार्थी काशिद येथे बुडाले; तिघांना वाचविण्यात यश, दोघांचा शोध सुरु
औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील साने गुरुजी विद्यालयाचे पाच विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्र किनाऱ्यावर बुडाल्याची घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांपैकी तिघांना वाचवण्यात यश आले असून दोन बेपत्ता विद्यार्थ्यांचा शोध सुरु आहे.साने गुरुजी विद्यालयाचे ७० विद्यार्थी आणि पाच शिक्षक सोमवारी सहलीसाठी रायग़ड जिल्ह्यात आले होते. दुपारी बारा वाजता हे सर्व जण मुरुड तालुक्यातील काशिद समुद्र किनाऱ्यावर उतरले होते. समुद्र स्थानाचा आनंद घेत असतांना, पाण्याचा अंदाज न आल्याने, यातील पाच जण बुडाले. स्थानिक बचाव पथकांनी तिघांना वाचविण्यात यश आले. मात्र दोन जण बुडाले.
पुणे : महाराष्ट्र केसरी गदेची परंपरा कायम राहणार, उद्यापासून स्पर्धेला सुरुवात
राज्याच्या कुस्ती क्षेत्रात प्रतिष्ठेची असणारी महाराष्ट्र केसरी स्पर्धा उद्या मंगळवारपासून पुण्यात सुरू होत आहे. स्पर्धेसाठी मातीचे आखाडे आणि मॅट सज्ज झाली असून, मैदानाबाहेर स्पर्धेच्या मान्यतेवरून वेगळाच आखाडा रंगत आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर विजेत्या मल्लास मानाची गदा प्रदान करण्याची मोहोळ कुटुंबीयांची परंपरा यंदाही कायम राहणार आहे.महाराष्ट्र केसरी किताबाची लढत जिंकणाऱ्या मल्लास मोहोळ कुटुंबीयांच्या वतीने चांदीची गदा प्रदान करण्यात येते. ही गदा १९६१ च्या पहिल्या स्पर्धेपासून देण्यात येते. १९८२ पर्यंत ही गदा राज्य कुस्तीगीर परिषदेच्या वतीने दिली जात होती. त्यानंतर मात्र आजपर्यंत ही गदा मामासाहेब मोहोळ यांच्या स्मरणार्थ चिरंजीव माजी खासदार अशोक मोहोळ कुटुंबीयांच्या वतीने दिली जाते. यावेळी या स्पर्धेस राज्य कुस्तीगीर परिषदेची मान्यता नाही, असे म्हटले जात आहे. त्यामुळे गदेची परंपरा खंडित होणार की काय, अशी भीती व्यक्त केली जात होती.
स्विस नॅशनल बँकेला २०२२ मध्ये १४३ अब्ज डॉलर्सचा तोटा; ११५ वर्षांच्या इतिहासातला सर्वात मोठा धक्का!
स्विस नॅशनल बँकेला २०२२ मध्ये १३२ स्विस फ्रँक म्हणजेच १४३ अब्ज डॉलर्सचा वार्षिक तोटा झाला आहे. सोमवारी ही बाब सांगण्यात आली. या बँकेच्या ११५ वर्षांच्या इतिहासात हा सर्वात मोठा तोटा आहे. शेअर आणि बॉण्ड पोर्टफोलिओच्या मूल्यात घट झाल्याने हा तोटा झाला आहे. या घटनेमुळे बाजारात तेजीत असलेल्या स्विस फ्रँकचाही नकारात्मक परिणाम झाला.स्विस नॅशनल बँक या प्रकरणात ६ मार्चला तपशीलवार आकडेवारी जाहीर करणार आहे. स्विस फ्रँक कमकुवत झाला याची विविविध कारणं आहेत. स्विस बँकेने ८०० अब्ज किंमतीचे स्टॉक्स आणि बॉण्ड्स यामध्येच १३१ अब्ज फ्रँकचं नुकसान झालं. जागतिक शेअर बाजारात मंदी आली. त्यामुळे रोखीच्या किंमती गेल्या वर्षी घसरल्या. यामुळे स्विस नॅशनल बँकेसह सगळ्यात बँकांनी महागाईचा सामना करण्यासाठी व्याजदर वाढवले. मात्र हे देखील तोट्याच्या दिशेने घेऊन जाणारं कारण ठरलं. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
टीम इंडियाला मोठा धक्का! संघात असूनही श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेला जसप्रीत बुमराह मुकणार
भारतीय संघ १० जानेवारीपासून श्रीलंकेविरुद्ध ३ एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे, मात्र त्याआधी भारतीय चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. टीम इंडियाचा एक घातक गोलंदाज वनडे मालिकेतून वगळण्यात आला आहे. हा खेळाडू किलर बॉलिंगमध्ये निपुण आहे. एकदिवसीय मालिकेतून या खेळाडूला वगळण्यात आल्याने भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणाला मोठा धक्का बसला आहे.‘हमसे दिल लगा क्यूँ’ हे गाणे नाही का, जेव्हा ते मन तोडायचे होते तर आधी चांगली बातमी का दिली अशी प्रतिक्रिया बुमराहच्या सर्व चाहत्यांकडून व्यक्त होत आहे. जसप्रीत बुमराहची सध्याची स्थितीही अशीच आहे. श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी, बीसीसीआय निवडक बुमराहच्या प्रेमात पडले, म्हणजे त्याचा संघात समावेश करण्यात आला. आणि मग जेव्हा पहिल्या एकदिवसीय सामन्याचा दिवस जवळ आला तेव्हा प्रत्येक क्रिकेट चाहत्याचे हृदय हेलावेल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. बुमराह एकदिवसीय मालिकेतून बाहेर असल्याची बातमी सूत्रांनी दिली. अशा स्थितीत त्याला पोट भरण्याची सोय नसताना तो संघात का सामील झाला हा मोठा प्रश्न आहे.
SD Social Media
9850 60 3590