कोल्हापूर उत्तर विधानसभा
पोटनिवडणुकीत काँग्रेस विजयी
संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव झालेला आहे. कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १९ हजार मतांनी विजय मिळवला आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी विरुद्ध भाजपा अशी पाहायला मिळत होती. पोटनिवडणुकीत पुरोगामी विचारातून सुरू झालेला प्रचाराचा मुद्दा हिंदूत्वाच्या वळणावर येऊन ठेपला होता. हिंदूत्ववादी विचारसरणीच्या मतदारांना आपल्याकडे खेचण्याच्या अखेरच्या टप्प्यात महाविकास आघाडी आणि भाजपा या दोन्हीकडून प्रयत्न केला होता.
पण शिवसेनेने मतदार व मतदारसंघ
दोन्ही गमावले : केशव उपाध्ये
काँग्रेस-राष्ट्रवादी जिंकली, पण शिवसेना हरली. भाजपाने ही फक्त निवडणूक गमावली पण शिवसेनेने मतदार व मतदारसंघ दोन्ही गमावले.” अशा शब्दांमध्ये भाजपा प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीत भाजपाच्या पराभवानंतर प्रतिक्रिया दिली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचा पराभव असून, काँग्रेसच्या उमेदवार जयश्री जाधव यांनी १९ हजार मतांनी विजय मिळवला आहे.
जून महिन्यात कोरोनाची
चौथी लाट येण्याची शक्यता
जून महिन्यात कोरोनाची चौथी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कानपूर IITमध्ये करण्यात आलेल्या एका संशोधनातून 22 जूनच्या आसपास देशात चौथी लाट सुरू होण्याचा अंदाज आहे. ओमायक्रॉनच्या XE या व्हेरियंटमुळे चौथ्या लाटेचा धोका वाढल्याचा निष्कर्ष या अभ्यासात काढण्यात आलाय. ऑगस्टमध्ये कोरोनाची चौथी लाट सर्वोच्च बिंदूवर असेल, असाही अंदाज आहे.
राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना न
सांगता स्वतः रस्त्यावर उतरावे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंग्यांना विरोध करत हनुमान चालिसा लावण्याचे आदेश मनसैनिकांना दिले आहेत. यामुळे गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. त्यानंतर आता राज ठाकरे पुण्यात दाखल झाले असून शनिवारी हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौक मारुती मंदिरात महाआरती करणार असून सामूहिक हनुमान चालिसा पठण केलं जाणार आहे. यावरुन आता विविध स्तरातून प्रतिक्रिया येत आहे. राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना न सांगता स्वतः रस्त्यावर उतरावे असे आव्हान एका माजी मनसे सैनिकाने केले आहे.
तर देशात कोणीही बेरोजगार
रहाणार नाही : पंतप्रधान
हनुमान जयंतीच्या निमित्ताने गुजरामधील मोरबी गावात असलेल्या १०८ फुट उंच हनुमानाच्या मूर्तीचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांनी रिमोट्वारे केले. अशीच एक उंच मूर्ती ही सिमलामध्ये असून आणखी दोन उंची मूर्तींची निर्मिती ही रामेश्वर आणि पश्चिम बंगलामध्ये केली जात असल्याची माहिती यानिमित्ताने मोदी यांनी दिली
आपण आत्मनिर्भर कसे बनत आहोत याकडे बघत आहे. आपण स्थानिक वस्तू, उत्पादने ही विकत घेतली पाहिजेत. स्थानिक लोकांनीच तयार केलेली उत्पादने ही आपल्या घरात असली पाहिजेत. यामुळे आपल्याच लोकांचा, स्थानिकांना रोजगार मिळेल. आपण पुढील २५ वर्षे स्थानिक उत्पादने विकत घेतली तर देशात कोणाही बेरोजगार रहाणार नाही”.
अनिल देशमुख यांचा जामिनासाठी मार्ग मोकळा, न्यायालयात घडली महत्त्वाची घडामोड
100 कोटी वसुली प्रकरणी राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख गेल्या काही दिवसांपासून सीबीआयच्या ताब्यात आहे. पण, आता अनिल देशमुख यांचा जामिनासाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. न्यायालयाने देशमुख यांना न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. त्यामुळे देशमुख पुन्हा एकदा जामिनीसाठी प्रयत्न करणार आहे.100 कोटी वसुली प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. सीबीआयने अनिल देशमुख यांच्यासह त्यांच्या सचिवांना आणि सचिन वाझेला ताब्यात घेतले आहे. आज या प्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टात हजर करण्यात आले होते. यावेळी अनिल देशमुख यांना सीबीआय न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
बस्तरमध्ये CRPFची ड्रोनच्या सहाय्यानं नक्षलवादी तळांवर कारवाई
छत्तीसगडच्या नक्षली भागात शुक्रवारी (15 एप्रिल 22) पहाटे, केंद्रीय राखीव पोलीस दलाकडून नक्षलविरोधी एक मोठे ऑपरेशन करण्यात आले, असे सूत्रांनी न्यूज 18 ला सांगितले. अत्याधुनिक ड्रोनच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. ड्रोनचा वापर ऑपरेशन सुरू करण्यासाठी आणि समाप्त करण्यासाठी करण्यात आला होता, अशीही माहिती मिळाली आहे. ड्रोनचा वापर नक्षलवाद्यांविरुद्ध शस्त्र म्हणून केला गेला, असंही सूत्रांनी सांगितले. बस्तर जिल्ह्याच्या दक्षिणेकडील भागात ही कारवाई करण्यात आली होती, अशी माहिती त्यांनी दिली.
ज्याने भाड्याने हिंदुत्व घेतले त्याने
आम्हाला हिंदुत्व शिकवू नये : संजय राऊत
काल कुणी तरी मातोश्रीवर हनुमान चालीसा वाचू असा इशारा दिला. पण, ज्यांनी ही धमकी दिलीय त्यांनी आम्हाला हिंदुत्व शिकवू नये. आज हनुमान जयंती आणि सगळीकडे हनुमान चालीसा, भोंगे वाजताहेत. पण, ज्याने भाड्याने हिंदुत्व घेतले त्याने आम्हाला हिंदुत्व शिकवू नये, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला आहे. आज हजारो शिवसैनिक मातोश्रीबाहेर जमले. तिकडे कोल्हापूर उत्तर पोटनिवडणुकीचा निकाल लागला. निवडणुकीत प्रचार शिगेला पोहोचला. याच काळात काही लोकांनी भोंगे, हनुमान चालीसा यावरून घाणेरडे राजकारण सुरु केले.
काँग्रेस उमेदवाराला
नोटा पेक्षाही कमी मते
बिहारमधील मुझफ्फरपूर जिल्ह्यातील बोचहान विधानसभा जागेच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय जनता दलचे उमेदवार अमर पासवान विजय झाला आहे. मतमोजणीत अमर पासवान यांना ८२,५६२ मते, भाजप उमेदवार बेबी कुमारी यांना ४५९०९ आणि व्हीआयपी पक्षाच्या उमेदवार गीता कुमारी यांना २९२७९ मते मिळाली आहेत. अशा प्रकारे अमर पासवान 36 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले आहेत. पण येथे काँग्रेस उमेदवार चर्चेत आला आहे. कारण त्याला नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत.
SD social media
9850 60 35 90