शिवसेनेला धक्का, शिंदे गटाला दिलासा
शिवसेना कुणाची? या प्रश्नाभोवती मागील 3 महिन्यांपासून राज्याचे राजकारण ढवळून निघाले आहे.आज सकाळपासून सुप्रीम कोर्टामध्ये याच वादावर प्रदीर्घ सुनावणी सुरू होती. अखेरीस सुप्रीम कोर्टाने शिंदे गटाला मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक आयोगाबद्दलच्या आधीच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. तसंच, शिवसेना कुणाची याचा निर्णय निवडणूक आयोगाकडे सोपवला आहे.शिवसेनेमध्ये बंडखोरी झाल्यामुळे शिवसेना कुणाची असा प्रश्न निर्माण झाला. या प्रकरणावर अखेर सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील घटनापीठासमोर सुनावणी पार पडली. यावेळी शिंदे गटाकडून निरंजन कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेकडून कपिल सिब्बल आणि अभिषेक मनु सिंघवी यांनी युक्तिवाद केला. तर शिंदे गटाकडून निरंजन कौल यांनी युक्तीवाद केला.
आशा पारेख यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव
हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आशा पारेख यांना नुकतंच दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर झाला आहे.माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही घोषणा केली आहे. राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात आशा पारेख यांना या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे.दरम्यान आता आशा पारेख यांचं व्यावसायिक आणि खाजगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. बऱ्याच लोकांना त्यांच्या खाजगी आयुष्याबाबत जाणून घेण्याची उत्कंठा लागून आहे.
पुणे : आयुका केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या स्कूल बसला भीषण अपघात, 44 विद्यार्थी जखमी
पुण्यातील एक मोठी बातमी समोर आली आहे. आयुका केंद्र पाहण्यासाठी गेलेल्या स्कूल बसला भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत तब्बल 44 विद्यार्थी जखमी झाले आहेत. हे विद्यार्थी आंबेगाव तालुक्यातील पिंपळगाव घोडे येथील मुक्ताई प्रशालेचे विद्यार्थी आहेत.आंबेगाव तालुक्यातील मुक्ताई प्रशाला पिंपळगाव तर्फे घोडा येथील शाळेची बस मौजे गिरवली येथील आयुका दुर्बीण पाहण्यासाठी गेली होती. मात्र, याचदरम्यान, ही बस दरीमध्ये गेली. यावेळी बसमध्ये 44 विद्यार्थी व 3 शिक्षक वर्ग होता. सर्वांना बाहेर काढण्यात आलेले आहे. तर 4 मुले मंचर येथे पाठवण्यात आलेले आहे. बचाव कार्य करण्यात आलेले असून ॲम्बुलन्स द्वारे सर्वांना ग्रामीण रुग्णालय घोडेगाव येथे दाखल करण्यात आलेले आहे. तसेच व वैद्यकीय सुविधा देण्याचे कामकाज सुरू आहे.
शिंदे-ठाकरेंच्या वादात सुळेंची उडी!
शिंदे गटाने बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली. त्यातच शिवसेना कोणाची हा प्रश्न उपस्थित झाला असून त्यात सुप्रीम कोर्टात लढाई सुरू आहे. ही लढाई दुर्दैवी असल्याचं मत खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं नाव चालतं, बाकी सगळं काही चालतं मग बाळासाहेबांसाठी सर्वस्व असलेलं मुलगा आणि नातू त्यांना का चालत नाही? असा सवाल सुळे यांनी उपस्थित केला आहे. पारनेरमध्ये आमदार निलेश लंके प्रतिष्ठान यांच्या माध्यमातून एक लाख महिलांची मोहटा देवी दर्शनाची मोफत बस सेवा सुरू करण्यात आली. त्याच्या उद्घाट्नाला सुप्रिया सुळे अहमदनगरला आल्या होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.
गोदावरीच्या काठावर साकारलंय भव्य स्वामीनारायण मंदिर, बुधवारी होणार मुख्य मूर्तींची प्राणप्रतिष्ठा
मंदिरांची नगरी अशी ओळख असलेल्या नाशिकमध्ये आणखी एक भव्य मंदिराचे काम पूर्ण झाले आहे. नाशिकच्या तपोवन परिसरात भव्य बीपीएस स्वामी नारायण मंदिर साकारण्यात आले आहे. गेल्या चार वर्षांपासून या मंदिराचे काम सुरू होते. मध्यंतरी कोरोना काळात काही दिवस काम थांबण्यात आले होते. 23 सप्टेंबरपासून मंदिरातील मूर्तींच्या प्राणप्रतिष्ठा उत्सवास सुरुवात झाली आहे. या उत्सवामध्ये सोमवारी (26 सप्टेंबर) विश्वशांती महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते. मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्या निमित्त ब्रम्हस्वरूप महंत स्वामींचे आगमन नाशिकमध्ये झाले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंदिर परिसरासह शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
‘माफी मागा, अजून बरंच बाहेर निघेल’, आशिष शेलारांचा आदित्य ठाकरेंना इशारा
वेदांता-फॉक्सकॉन प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेल्यामुळे राज्यातलं राजकारण तापलं आहे. आता भाजपने शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी एक पत्रक प्रसिद्ध करत आदित्य ठाकरेंना माफी मागण्याची मागणी केली आहे.
वेदांता फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे शिंदे सरकारची मोठी गोची झाली. आदित्य ठाकरे यांनी एकापाठोपाठ पत्रकार परिषद घेऊन शिंदे सरकारवर आरोप केले. आज भाजपचे मुंबईचे शहर अध्यक्ष आशिष शेलार यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे पत्रक प्रसिद्ध केले आहे.
चीन-तुर्की-पाकचा सामना करण्यापासून ते UN सुधारणांपर्यंत, जयशंकर यांनी मांडली रोखठोक बाजू
युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीच्या 77 व्या परिषद होत आहे. दरम्यान या परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी देशाचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर गेले आहेत. यादरम्यान त्यांनी या परिषदेत जोरदार भाषण केले आहे. यावर जागतिक नेत्यांनी जागतिक शांतता आणि विकासासाठी भारताच्या वचनबद्धतेबद्दल प्रशंसा केली.UNGA मध्ये, परराष्ट्र मंत्र्यांनी ग्लोबल साउथमधील भागीदारांसह तसेच पश्चिमेकडील सहयोगी देशांसोबत बैठका झाल्या यामध्ये भारताला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे दिसत आहे. UNGA मधील त्यांच्या बैठकांमध्ये आणि तसेच शिखर परिषदेच्या बाजूला झालेल्या बैठकांमध्ये, जयशंकर यांनी UNSC सुधारणावर जोरदार भाषण केले. दहशतवादाच्या प्रायोजकांना त्यांनी थेट आव्हान दिले. या अशांत जगात भारत कशा प्रकारे सद्भावना देऊ शकतो याचेही दाखले जयशंकर यांनी दिले.
सीबीआयने गिरीश महाजनांवर गुन्हा दाखल केल्याची चर्चा
भाजपाचे नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांच्यावर सीबीआयने गुन्हा दाखल केल्याची जोरदार चर्चा आहे. यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आहे. याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला. त्यावर फडणवीसांनी सीबीआयने कोणताही गुन्हा दाखल केलेला नाही, असं सांगितलं. तसेच मागील काळात गिरीश महाजनांवर सीआयडीकडे दाखल गुन्हा सीबीआयकडे देण्यात आल्याची माहिती दिली. ते मंगळवारी (२७ सप्टेंबर) मुंबईत पत्रकारांशी बोलत होते.
बापरे! २१ हजार कोटींची GST नोटीस
बंगळुरुमधील एका गेमिंग कंपनीला तब्बल २१ हजार कोटी रुपयांची वस्तू व सेवा कर (जीएसटी) नोटीस पाठवण्यात आली आहे. ‘गेम्सक्राफ्ट टेक्नोलॉजी’ असं या कंपनीचं नावं आहे. २०१७ ते ३० जून २०२२ दरम्यान या कंपनीने जीएसटीच्या माध्यमातून करचोरी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ‘गेम्सक्राफ्ट’ला आता जीएसटी महासंचालनालयाने कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे. आतापर्यंत जीएसटी संकलनासाठी देशात पाठवण्यात आलेली ही सर्वाधिक रकमेची नोटीस आहे.
गांधी कुटुंबांवरील दवाबतंत्र अशोक गेहलोतांना भोवलं
राजस्थान काँग्रेसमधील मुख्यमंत्रीपदाचा पेच अद्यापही कायम आहे. अशोक गेहलोतांना हटवून काँग्रेस नेते सचिन पायलट यांच्याकडे मुख्यमंत्रीपद देण्यास आमदारांनी विरोध केला आहे. त्यानंतर आता मोठी माहिती समोर आली आहे. अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाहेर पडले आहेत. गेहलोत यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्यास नकार दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. याबाबात एनडीटीव्हीने वृत्त दिलं आहे.
शिंजो आबेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, पंतप्रधान मोदींनी वाहिली श्रद्धांजली
जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांना टोकियोमध्ये शासकीय इतमामात आज अखेरचा निरोप देण्यात आला. अंत्यसंस्कारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यासह जगभरातील दिग्गज नेते उपस्थित होते. यावेळी पंतप्रधान मोदींकडून आबे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. अंत्यसंस्कारासाठी ७०० परदेशी पाहुणे उपस्थित होते.
प्रो कबड्डी लीग नवव्या हंगामाच्या तारखा जाहीर, या तीन शहरांमध्ये होणार सामने
विवो प्रो कबड्डी लीग २०२२ च्या आयोजकांनी नवव्या हंगामाच्या तारखा जाहीर केल्या आहेत. या वेळी लीग ७ ऑक्टोबर २०२२ पासून सुरू होईल आणि डिसेंबरच्या मध्यापर्यंत चालेल. लीग टप्पा बेंगळुरू, पुणे आणि हैदराबाद येथे आयोजित केला जाईल. विवो पीकेएल हंगाम ९ च्या घोषणेनंतर, लीग कमिशनर अनुपम गोस्वामी यांच्या हस्ते मशाल स्पोर्ट्स पेटवून या लीगचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते म्हणाले, “ कब्बडी या स्वदेशी खेळाला समकालीन इतर खेळांबरोबर आणि क्रीडा चाहत्यांच्या भावी पिढ्यांपर्यंत पोहचवण्यासाठी हा उपक्रम आपण दरवर्षी करत असतो. कबड्डी हा खेळ जगासमोर नेण्याच्या दृष्टीकोनातून विवो प्रो कबड्डी लीगचा प्रवास सुरू केला आहे.”
संजू सॅमसनचे अर्धशतक!, लॉर्ड ठाकूर आणि तिलक वर्मा यांचीही शानदार फटकेबाजी
भारत अ विरुद्ध न्यूझीलंड अ यांच्यात मालिकेतील शेवटचा आणि तिसरा एकदिवसीय सामना सुरू आहे. एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे खेळल्या जाणाऱ्या या एकदिवसीय सामन्यात भारताचे नेतृत्व संजू सॅमसन करत आहे. या सामन्यात त्याने कर्णधारपदाला साजेशी खेळी केली आहे. भारताने या सामन्यात ४९.३ षटकात सर्वबाद २८४ धावासंख्या उभारली आहे.
SD Social Media
9850 60 3590