बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूरने काल आपला वाढदिवस साजरा केला. या हॅन्ड्सम हंक अभिनेत्याने यंदा चाळीशी पार केली आहे. हा वाढदिवस रणबीर आणि आलियासाठी फारच खास होता. कारण या दोघांच्या लग्नानंतरचा हा पहिलाच वाढदिवस होता. रणबीरच्या 40 व्या वाढदिवसानिमित्त आलियाने जंगी सेलिब्रेशन केलं. यावेळी एका पार्टीचसुद्धा आयोजन करण्यात आलं होतं. या पार्टीमध्ये बॉलिवूड कलाकारांनीं हजेरी लावली होती. आलियाने काल उशिरा सोशल मीडियावर रणबीरच्या बर्थडे सेलिब्रेशनचा एक फोटो शेअर करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्री आणि रणबीरची पत्नी आलिया भट्टने इन्स्टाग्राम अकाउंटवर रणबीर कपूरचा एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो अभिनेत्याच्या बर्थडे सेलिब्रेशनचा असल्याचं दिसून येत आहे. या फोटोमध्ये रणबीरने पांढऱ्या रंगाचा कुर्ता परिधान केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये आलियाने रणबीरचा फोटो हातात घेतला आहे. ज्यामध्ये ‘चीयर्स टू 40 इयर्स’ असं लिहलं आहे. रणबीर कपूरची आई नीतू कपूर यांनीही आलियाच्या या फोटोवर एक सुंदर इमोजी पोस्ट केली आहे. तसेच चाहत्यांसोबतच अनेक सेलेब्रेटींनी या फोटोंवर लाईक्स कमेंट्स करत शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.
रणबीर कपूर हा अत्यंत शांत आणि गोड अभिनेता समजला जातो.तो आपल्या चाहत्यांशी नेहमीच हटके अंदाजात संवाद साधतो. यंदा रणबीर कपूरने वाढदिवसानिमित्त चाहत्यांची भेट घेतली. त्याच्या अपार्टमेंटच्या बाहेर अनेक चाहते उपस्थित होते. रणबीर बाहेर निघताच चाहते उत्सुक झाले होते. यावेळी कारमध्ये बसून रणबीर कपूरने चाहत्यांसोबत केक कापला आणि सर्वांचे आभार मानले. यादरम्यान आलिया भट्टही रणबीरसोबत कारमध्ये बसलेली दिसून आली. त्याच्या वाढदिवसानिमित्त चाहत्यांनी त्याच्यासोबत सेल्फी घेत त्याला शुभेच्छा दिल्या आणि त्याचे आभार देखील व्यक्त केले.