आज बॉलिवूड स्टार अजय देवगणचा वाढदिवस

अजय देवगणचे खरे नाव विशाल देवगण. अजय देवगणचे शिक्षण मुंबईत मिठीबाई कॉलेज मध्ये झाले. अजय देवगण हा एक असा कलाकार आहे, ज्याने कोणाचीही मदत न घेता बॉलिवूडमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अजयचे वडील विरु देवगण यांचे नाव बॉलिवूडमध्ये यशस्वी स्टंट डायरेक्टर म्हणून घेतले जाते. या व्यतिरिक्त अजयची आई वीना देवगण यांनी एक चित्रपट प्रोड्यूस केला आहे. भाऊ अनिल देवगण यांनी एक चित्रपट दिग्दर्शित केला आहे. अजयने जेव्हा चित्रपटात काम करण्याची इच्छा वडिलांजवळ व्यक्त केली, तेव्हा ते अजयला महेश भट्टकडे घेऊन गेले. अजयच्या डोळ्यांकडे पाहून महेश भट्ट म्हणाले, याचे डोळे बोलतात आणि यामध्ये बरेच काही लपलेले आहे. “फूल और काटे” या चित्रपटातून त्याने आपले करियर सुरू केले आणि बऱ्याच चित्रपटात उल्लेखनीय अभिनय केला. अजय देवगणने काजोलसोबत विवाह केला आहे. चित्रपट इंडस्ट्रीत येउन अजयला २२ पेक्षा जास्त वर्ष झाली असून, दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढत आहे. अजयचे आवडते कलाकार दिलीप कुमार असून त्यांच्यासोबत एकदा काम करण्याची अजयची इच्छा आहे. दिलजले ते अगदी गोलमालपर्यंत हटके सिनेमांमधून त्याने काम केलं आहे. “सिंघम’ मुळे अजय देवगणचे मार्केट वाढले. आता माझी सटकली हा अजयचा मराठी डायलॉग खूप हिट झाला. सोलर एनर्जीच्या कंपनीचे काम, हॉटेल व्यवसाय, चित्रपटांचे वितरण असे अनेक अजय देवगणचे व्यवसाय आहेत. ओंकारा, द लीजेंड ऑफ भगतसिंग, हम दिल दे चुके सनम, जखम, दृष्यम, बोल बच्चन, तान्हाजी हे अजय देवगणचे काही चित्रपट. अजय देवगणला आपल्या समुहाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा.

संजीव वेलणकर,पुणे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.