छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो म्हणून ‘द कपिल शर्मा’ शो कडे आज पहिले जाते. या शोचा सूत्रसंचालक कपिल शर्मा याने त्याच्या विनोदाने अनेकांच्या मनात घर केले आहे. शो मधील कपिल शर्मा आणि त्याच्या इतर सहकाऱ्यांचे विनोद चाहत्यांच्या चांगल्याच पसंतीला उतरत असल्याचे पाहायला मिळत आहे. शोमध्ये येणारे कलाकार हे शोला आणखी रंजक करतात.
कपिल शर्माने आज जे काही कमावले आहे ते मेहनतीच्या जोरावर. एका छोट्या कुटुंबातून आलेल्या कपिल शर्माचे करिअर आज यशाच्या शिखरावर जाऊन पोहोचले आहे. त्याचा शो टीआरपी यादीमध्ये देखील पुढे आसल्याचे पाहायला मिळते. कपिल शर्माने आपल्या कारकिर्दीची सुरुवात एमएच 1 च्या कॉमेडी शो ‘हंसदे हंसादे ओ’ पासून केली होती. २००७ साली कॉमेडी रिअँएलिटी शो द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज मध्ये कपिल शर्माने भाग घेतला होता. या शोचा विजेता झाला आणि तो घराघरात पोहोचला. त्यानंतर त्याने अनेक शोमध्ये काम केले. कॉमेडी सर्कस,उस्तादों के उस्ताद यांसारख्या शोमध्ये त्याला चांगलीच पसंती मिळाली. त्यानंतर कपिलने कधी मागे वळून पाहिले नाही. यानंतर त्याने स्वत:चा कपिल शर्मा शो प्रेक्षकांच्या भेटीस आणला. कपिल शर्मा ने आपली मैत्रीण गिन्नी बरोबर १२ डिसेंबर २०१८ रोजी लग्न केले. पंजाब येथील जलंधरमध्ये महाविद्यालयीन प्रशिक्षण घेत असताना या दोघांची भेट झाली. गिन्नी आणि कपिल ‘हस बलिये’ कार्यक्रमात एकत्र दिसले होते. या कार्यक्रमादरम्यान त्यांच्यात जवळीक निर्माण झाली. या कार्यक्रमात विजेतेपद त्यांना मिळाले नाही. मात्र, त्यांच्या कामाची तेव्हा बरीच प्रशंसा झाली होती. कपिल शर्माने निर्माता म्हणून ‘सन ऑफ मनजीत सिंग’ या पंजाबी चित्रपटाची निर्मिती केली आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. कपिलने फोर्ब्स इंडिया सेलिब्रिटीच्या यादीत पहिल्या १०० मध्ये स्थान मिळवले आहे. २०१३ साली त्याला आईबीएन इंडियन आफ द इयर पुरस्कार मिळाला होता.
कोरोनासाठी मदत म्हणून कपिल शर्माने ५० लाख रू पंतप्रधान मदत निधीत दिले आहे.
कपिल शर्माचे आज पर्यतचे शो. द ग्रेट इंडियन लाफ्टर चैलेंज 3, स्टार या रॉकस्टार , कॉमेडी सर्कस, झलक दिखलाजा 6, कॉमेडी नाइट्स विद कपिल, द कपिल शर्मा शो.
संजीव वेलणकर ,पुणे