पुढील 48 तास जोरदार पावसाची शक्यता

राज्याच पावसाचा जोर वाढला आहे. तर कोकणमधील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून मुसळधार कोसळत आहे. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. तर मुंबईत रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. मुंबई शहरात सखल भागात पाणी साचले आहे. दुसरीकड मुंबई उपनगरांमध्येही पावसाची संततधार दिसून येत आहे. दरम्यान, पुढील 48 तास जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

मुंबई शहर उपनगरात रात्रीपासून संततधार पाऊस होत असून सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली आहे. कुर्ला, दादर परिसरात जोरदार पाऊस आहे. सायनचे गांधीमार्केट जलमय झाले आहे. तसेच सायनमध्ये पाणी साचले आहे. वडाळा परिसरातही पाणी साचले आहे.

जळगावात मुसळधार पावसात नाल्याला अचानक आलेल्या पुरात एक बैलगाडी वाहून गेली. यात बैलांचा मृत्यू झाला तर शेतकरी पुराच्या पाण्यात वाहून गेलाय. शेतकऱ्याच्या पत्नीला वाचवण्यात यश आले आहे. जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात निमभोरा गावात ही घटना घडली.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचे धुमशान सुरु आहे. निर्मला नदीला पूर आल्याने 27 गावांचा संपूर्ण तुटला आहे. दोडामार्गच्या तिलारी खोऱ्यातील अनेक कॉजवे पाण्याखाली गेलेत. पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

सिंधुदुर्गात गेले चार दिवस बरसणाऱ्या पावसाने मसुरे पंचक्रोशीत जनजीवन विस्कळीत झाले. रमाई नदीची पाण्याची पातळी वाढल्यानं मालवण बेळणे कणकवली मार्गावरील बागायत इथे पुराचे पाणी थेट बागायत तिठा इथल्या बाजारपेठेजवळ पोहचले. वडाचापाट गोळवण मार्गावर वडाचापाट इथे तर पोईप धरणावर पाणी असल्यानं हा मार्ग सुद्धा वाहतुकीस बंद झाला आहे.

कोकणातील एक स्टंट दोन युवकांच्या चांगलाच अंगाशी आली. पुलावरून पाणी वाहत असतानाही या युवकांनी पाण्यामध्ये गाडी टाकण्याचं धाडस केलं. अर्ध्या रस्त्यातच दोघेही बाईकवरून खाली पडले. ग्रामस्थांनी या दोघांनाही वाचवलंय. कुडाळ तालुक्यातील साळगाव इथं हा प्रकार घडलाय. ग्रामस्थांच्या जागरुकतेमुळे मोठा अनर्थ टळलाय. तुम्ही मात्र असलं धाडस करू नका, ते जीवघेणं ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.