पुण्याच्या धायरी परिसरामध्ये लागलेली भीषण आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन विभागाला यश आलं आहे. धायरीमध्ये लागलेल्या या आगीमध्ये 6 छोटे कारखाने जळाले आहेत. फर्निचर, वाहन दुरुस्ती, रंग स्प्रे बनवणे या प्रकारचे हे कारखाने होते. आगीच्या घटनास्थळी सिलेंडर आणि केमिकल बॅरलचे 8-10 स्फोट झाले. तसंच यामध्ये 2 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहनांनीही पेट घेतला होता. पुणे आणि पीएमआरडीए कडच्या 10 वाहनांच्या साहाय्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी ही आग पूर्ण विझवली. सुदैवाने या आगीत कोणीही जखमी झालं नाही किंवा जिवितहानी झाली नाही.
संध्याकाळी 7.10 मिनिटांच्या सुमारास ही आग लागली होती, रंग निर्मिता कारखान्यामध्ये सिलेंडरचा स्फोट होऊन ही भीषण आग लागली होती.