सार्वजनिक क्षेत्रातील आघाडीच्या पंजाब नॅशनल बँकेने (PNB) त्यांच्याकडील मुदत ठेव खात्यांवरील व्याजदरांबाबत मोठा निर्णय घेतला आहे. पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्याकडील मुदत ठेव खात्यांवरील व्याज दर बदलले आहेत. पंजाब नॅशनल बँकेने त्यांच्या ग्राहकांना 7 दिवसांपासून 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवीवर बँक 3.75 टक्के ते 5.25 टक्केपर्यंत व्याज देते. हे व्याज दर 1 मे 2021 पासून लागू झालेले आहेत.
पंजाब नॅशनल बँकेने व्याज दर बदलताना 7 ते 45 दिवसांच्या कालावधी साठी 3 टक्के व्याज देण्याची घोषणा केलीय. 1 वर्षापेक्षा कमी कालावाधीसाठी 4.5 टक्के तर 1 ते 3 वर्ष कालावधीसाठी 5.10 टक्के व्याज देण्यात येणार आहे. 5 ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी 5.25 टक्के व्याज देण्याची घोषणा पंजाब नॅशनल बँकेने केली आहे.
अॅक्सिस बँक (Axis Bank), आईडीएफसी फर्स्ट बँक (IDFC First Bank), कोटक महिंद्रा बँक (Kotak Mahindra Bank), आयसीआयसीआय बँक (ICICI Bank) आणि येस बँक (Yes Bank) ने या बँकांनी व्याज दर घटवले आहेत.
1 मे पासून नवे दर
7 – 14 दिवस- 3 %
15 – 29 दिवस- 3.00%
30 – 45 दिवस- 3.00%
46 – 90 दिवस- 3.25%
91 – 179 दिवस- 4 %
180 दिवस आणि 270 दिवसांपेक्षा कमी 4.4%
271 दिवस ते 1 वर्षापेक्षा कमी- 4.5 %
1 वर्ष – 2 वर्ष- 5.10%
2 वर्ष – 3 वर्ष- 5.25%
3 वर्ष 1 दिवस – 5 वर्ष – 5.25%
5 वर्ष 1 दिवस – 10 वर्ष – 5.25%
पंजाब नॅशनल बँकेने ज्येष्ठ नागरिकांनी ठेवलेल्या मुदत ठेवींवर 0.50 टक्के अधिक व्याज देण्याचा निर्णय घेतला आहे. 7 दिवसांपासून ते 10 वर्षापर्यंतच्या कालावधीसाठी त्यांना 3.5 टक्के 5.75 टक्के व्याज मिळणार आहे. आयडीएफसी फर्स्ट बँकेने त्यांच्याकडील बचत खात्यावरील व्याज दर घटवले आहेत. 1 लाख रुपयांपेक्षा कमी व्याजदर असलेल्या खात्यांवर 4 टक्के व्याज दिलं जाईल. दुसरीकडे 1 लाख रुपयांपासून 10 लाखापर्यंतची रक्कम खात्यावर ठेवणाऱ्यांसाठी 4.5 टक्के व्याज मिळेल. 10 लाख ते 2 कोटी रुपये कायम ठेवणाऱ्या खातेधारकारांना 5 टक्के व्याज मिळेल.
————