अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हीच्या निधनाची अफवा

कोरोना महामारीमुळे सध्या बॉलिवूड सेलेब्सच्या निधनाच्या बातम्या सतत येत असतात. त्यांच्या आवडत्या सेलेब्सविषयी अशा बातम्या वाचल्यानंतर चाहते देखील अस्वस्थ होतात आणि सोशल मीडियावर त्या सेलेब्सबद्दल चर्चा करू लागतात. आता या यादीमध्ये आणखी एक अभिनेत्रीचे नाव सामील झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री हीच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावर खूप चर्चेत आली आहे. वास्तविक ती चित्रपटांच्या जगातून गायब झाल्यामुळे अशी चर्चा सुरु झाली आहे.

मात्र, अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्री अगदी ठीक आहे, असे सांगत फिल्म फीव्हरने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिच्या आरोग्याविषयी माहिती दिली आहे. मीनाक्षी शेषाद्री यांच्या निधनाची अशी बातमी अचानक का येऊ लागली, यामागे देखील एक कारण आहे.

वास्तविक, 1 मे रोजी टीव्ही चॅनेल इंडिया टीव्हीवर, ‘तलाश एक सितारे की’ हा कार्यक्रम प्रदर्शीत झाला होता. या कार्यक्रमाचा संपूर्ण भाग 80 आणि 90च्या दशकाची सुपरहिट अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीबद्दल होता. यात तिच्या बॉलिवूड पदार्पणापासून मनोरंजन विश्वामधून अचानक गायब होण्याबद्दल अनेक गोष्टींवर चर्चा केली गेली. त्यानंतर या शोची टीम मीनाक्षी शेषाद्रीपर्यंत पोहोचण्यासाठी तिच्या कुटुंबियांसह आणि मित्रांशी बातचीत करत आहे.

चॅनलने सोशल मीडियावर या शोबद्दल पोस्ट करताच मीनाक्षी शेषाद्रीच्या चाहत्यांना वाटले की, तिचे निधन झाले आहे आणि प्रत्येक माध्यमात त्या अभिनेत्रीबद्दल चर्चा सुरु झाली .

अभिनेत्री मीनाक्षी शेषाद्रीने ‘पेंटर’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. पहिला चित्रपट काही विशेष जादू दाखवू शकला नाही, ज्यामुळे तिने अभिनय कारकीर्द सोडण्याचा निर्णय घेतला होता. मीनाक्षी शेषाद्रीचे खरे नाव शशीकला शेषाद्री होते. परंतु, तिने बॉलिवूडमध्ये प्रवेश करण्यासाठी आपले नाव बदलले होते. परंतु, त्यानंतर ती ‘हिरो’ या चित्रपटात दिसली आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. त्यानंतर त्यांनी ‘जंग’, ‘घातक’, ‘दामिनी’, ‘लव्ह मॅरेज’ सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. या चित्रपटांमुळे मीनाक्षी बॉलिवूडची सर्वोत्कृष्ट अभिनेत्री बनली. पण ‘घातक’ या चित्रपटा नंतर तिने बॉलिवूडला निरोप दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.