जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल जगमोहन यांचे मंगळवारी सकाळी दिल्लीत निधन झाले. ते 94 वर्षांचे होते. माजी केंद्रीय मंत्री असलेल्या जगमोहन यांचा पद्मविभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता. त्यांनी 1984-89 आणि जानेवारी-मे 1990 अशा दोनवेळेला जम्मू-काश्मीरचे राज्यपालपद भुषविले होते. या काळात काश्मीर खोऱ्यात दहशतवाद शिगेला पोहोचला होता. त्यांची राज्यपालपदाची कारकीर्द वादग्रस्त होती. तत्कालीन पंतप्रधान व्ही.पी. सिंह यांच्या टीकेनंतर जगमोहन यांना जम्मू-काश्मीरच्या राज्यपालपदावरून हटवण्यात आले होते.
जगमोहन यांनी 1996 साली पहिल्यांदा लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत विजयी ठरल्यानंतर वाजपेयी सरकारमध्ये त्यांनी नगरविकास आणि पर्यटन खात्याची जबाबदारी सांभाळली होती.