बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंत आजकाल सतत चर्चेत येत असते. तिला बर्याचदा मुंबईत स्पॉट केले जाते. अशातच आता अभिनेत्रीचा एक नवीन व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री कोरोना लस टोचून घेताना दिसत आहे. या लसीचा एक डोस घेत असताना अभिनेत्री तिच्या आगामी म्युझिक व्हिडीओबद्दल बोलताना दिसली. ज्यामुळे तिची ही लस टोचून घेण्याची शैली तिच्या चाहत्यांना खूप मजेशीर वाटली आहे. यामुळेच आता हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अभिनेत्री राखी सावंतने हा व्हिडीओ तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अभिनेत्री रुग्णालयात बसलेली दिसत आहे. जिथे तिने कोव्हिशील्ड लसीचा पहिला डोस घेतला आहे. पण इंजेक्शन घेताना राखी खूप घाबरली होती. यावेळी ती सतत तिच्या नवीन गाण्याचे प्रमोशन करत होती. राखी सावंत यांच्या नवीन गाण्याचे नाव आहे ‘तेरे ड्रीम मे मेरी एंट्री, मेरे ड्रीम मे तेरी एंट्री’, जे गाणे ती सतत गात होती. त्याने या व्हिडीओमधील नर्सला विचारले की, लस घेताना मला काही त्रास होणार नाही ना? दरम्यान, ती सतत तिच्या नवीन गाण्याचे प्रमोशन करत होती.
राखीचे चाहते तिच्या या व्हिडीओवर सतत प्रतिक्रिया देत आहेत. राखी सावंतचा जुना मित्र विंदू दारा सिंगनेही अभिनेत्रीच्या व्हिडीओवर कमेंट केली आहे की, “कोव्हिशील्डची एन्ट्री तुझ्या हातात झाली आहे” तर, राखी सावंतच्या इतर चाहत्यांनी “राखी तू लाजवाब आहेस”, अशा कमेंट केल्या आहेत. दरम्यान, राखी सावंतने तिच्या नवीन गाण्याचा छोटासा टीझरही रिलीज केला आहे. या गाण्यात अभिनेत्रीची अतिशय हॉट स्टाईल पाहायला मिळत आहे. राखीची हटके अदा पाहून तिचे चाहते उत्सुक झाले आहेत.