ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांची प्रकृती खालावली

ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक अमोल पालेकर यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. अमोल पालेकर यांना झालेल्या एका दीर्घ आजारवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांची पत्नी संध्या गोखले यांनी दिली आहे.

10 वर्षांपूर्वीही त्यांना याच आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आता त्यांच्यावर उपचार सुरु होत असून आता काळजी करण्यासारखं कोणतंही कारण नसल्याचं अमोल पालेकर यांची पत्नी संध्या गोखले यांनी म्हटलंय. अमोल पालेकर यांना अतिधुम्रपान केल्यामुळे त्रास झाला होता. त्यामुळे 10 वर्षांपूर्वी त्यांच्यावर रुग्णालयात उपचार घेण्याची वेळ आली होती. दरम्यान, आता पुन्हा एकदा त्यांना रुग्णालयात उपचार घेण्यासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

अमोल पालेकर यांनी 70 आणि 80 च्या दशकात एक काळ गाजवलेला होता. मराठीसोबतच अमोल पालेकर यांनी हिंदी सिनेसृष्टीतही केलेलं कामाची आजही अनेकजण आठवण काढतात. फक्त विनोदी भूमिकाच नव्हे तर वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका ताकदीनं साकारणारा अभिनेता म्हणून अमोल पालेकर यांच्या पाहिलं जातं. एक उमदे चित्रकार असणाऱ्या अमोल पालेकर यांनी सिनेसृष्टीतत येण्याआदी एका बँकेत नोकरी केली होती. बँक ऑफ इंडियात अमोल पालेकर क्लार्क म्हणून काम करायचे.

मराठीतील शांतता कोर्ट चालू आहे, या सिनेमांच्या माध्यमातून अमोल पालेकरांनी सिनेमाक्षेत्रात पर्दापण केलं. बाजीरावचा बेटा हा सिनेमाही अमोल पालेकरांच्या सुरुवातीच्या काळातील उल्लेखनीय सिनेमांपैकीच एक होता. दरम्यान, गोलमाल सिनेमातील त्यांचा डबलरोल आजही लोकं विसरलेली नाहीत. चितचोर, रंगी-बेरंगी, बातों बातों मे हे सिनेमा रसिकांना प्रचंड भावले होते. आपल्या सिनेमाची एक वेगळी ओळख त्यांनी हिंदी सिनेक्षेत्रात तयार केली होती. यानंतर त्यांनी शाहरुख खान आणि राणी मुखर्जीच्या पहेली सिनेमाचं दिग्दर्शनही केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.