नाशिकमध्ये कोरोनाचे भय काही केल्या संपत नाही. ओमिक्रॉन विषाणूमुळे रुग्णालयात भरती होण्याचे प्रमाण कमी झाले. मात्र, गेल्या काही दिवसांत मृत्यूचे प्रमाण झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात 8 फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा कोरोनाने तिघांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यातील दोन रुग्ण नाशिक महापालिका क्षेत्रातील असून, एक रुग्ण नाशिक ग्रामीणमधील आहे.
दुसरीकडे सध्या नाशिक, निफाड, सिन्नर येथे रुग्ण संख्या जास्त आढळत आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयामार्फत आज प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील 4 लाख 60 हजार 593 कोरोना बाधितांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. सद्यस्थितीत 3 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच उपचार सुरू असलेल्या रुग्णांमध्ये 574 ने घट झाली आहे. आत्तापर्यंत 8 हजार 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती जिल्हा नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार यांनी दिली आहे.
उपचार घेत असलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये नाशिक ग्रामीणमध्ये नाशिक 123, बागलाण 112, चांदवड 99, देवळा 116, दिंडोरी 110, इगतपुरी 32, कळवण 146, मालेगाव 46, नांदगाव 124, निफाड 295, पेठ 86, सिन्नर 286, सुरगाणा 120, त्र्यंबकेश्वर 69, येवला 110 असे एकूण 1 हजार 874 पॉझिटीव्ह रुग्णांवर ग्रामीण भागात उपचार सुरू आहेत.
तसेच नाशिक महानगरपालिका क्षेत्रात 1 हजार 707, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रात 64 तर जिल्ह्याबाहेरील 85 रुग्ण असून असे एकूण 3 हजार 730 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत जिल्ह्यात 4 लाख 73 हजार 176 रुग्ण आढळून आले आहेत.नाशिक ग्रामीणमध्ये काल आढळून आलेल्या बाधित रुग्णांमध्ये नाशिक 25, बागलाण 6, चांदवड 13, देवळा 14, दिंडोरी 7, इगतपुरी 7, कळवण 8, मालेगाव 6, नांदगाव 26, निफाड 40, पेठ 5, सिन्नर 18, सुरगाणा 24, त्र्यंबकेश्वर 12, येवला 25 असे एकूण 236 पॉझिटीव्ह रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत.
जिल्हयात रुग्ण बरे होण्याची टक्केवारी नाशिक ग्रामीणमध्ये 96.49 टक्के, नाशिक शहरात 97.87 टक्के, मालेगावमध्ये 96.11 टक्के तर जिल्हा बाह्य रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण 97.43 टक्के आहे. तसेच जिल्ह्यात बरे होण्याचे प्रमाण 97.34 इतके आहे. आतापर्यंत कोरोनामुळे नाशिक ग्रामीणमध्ये 4 हजार 281 जणांचा मृत्यू झाला आहेच. नाशिक महानगरपालिका क्षेत्रातून 4 हजार 82, मालेगाव महानगरपालिका क्षेत्रातून 364 व जिल्हा बाहेरील 126 अशा एकूण 8 हजार 853 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.