अभिनेत्री रिया चक्रवर्ती ही गेल्या अनेक दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी ‘द टाइम्स ५० मोस्ट डिजायरेबल वुमन २०२०’ च्या लिस्टमध्ये रिया नंबर १ ला होती. ऑनलाइन मतदानात मिळालेल्या मतांवर आणि अंतर्गत निर्णायक मंडळींनी हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, लवकरच रिया महाभारत या पौराणिक कथेवर आधारित चित्रपटात महत्वाची भूमिका साकारणार असल्याच्या चर्चा सुरु आहेत.
रिपोर्टनुसार, “या चित्रपटात महाभारत ही कथा आणि द्रौपदीचं पात्र हे वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात येणार आहे. त्याची कथा ही आधुनिक आणि सध्याच्या काळावर आधारीत असणार आहे. द्रौपदीच्या भूमिकेसाठी रियाला विचारण्यात आलं आहे. सध्या ती या भूमिकेवर विचार करत आहे. आतापर्यंत फक्त चर्चा सुरु आहे.”
दिवंगत अभिनेता सुशांतच्या निधनानंतर रियाला ट्रोल करण्यात आलं होतं. मात्र, आता रिया पूर्वपदावर येत असल्याचे दिसतं आहे. रिया लोकांकडे काम मागताना दिसतं आहे, जेणेकरून ती आयुष्यात पुढे जाऊ शकते.
रिया लवकरच ‘चेहरे’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन, इमरान हाशमी, अन्नू कपूर, रघुवीर यादव हे कलाकार मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. हा चित्रपट एप्रिल महिन्यात प्रदर्शित होणार होता. मात्र, करोनामुळे लागु करण्यात आलेल्या निर्बंधांमुळे चित्रपट प्रदर्शिनाची तारीख ही पुढे ढकलण्यात आली आहे.