सचिन तेंडुलकर उपचारासाठी रुग्णालयात दाखल

कोरोनावरील उपचारांसाठीच सचिनला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून सचिन घरीच होम क्वारंटाइन होता. मात्र डॉक्टरांच्या सल्लानुसार तो रुग्णालयामध्ये दाखल झाला आहे. सचिननेच ट्विट करत ही माहिती दिली आहे.

“माझ्या तब्बेतेसाठी प्रार्थना करणाऱ्या आणि शुभेच्छा देणाऱ्यांचे आभार. दक्षता म्हणून मी वैद्यकीय सल्ल्यानुसार रुग्णालयामध्ये दाखल झालो आहे. पुढील काही दिवसांमध्येच मी पुन्हा घरी येईन अशी अपेक्षा आहे. सर्वांनी काळजी घ्या आणि सुरक्षित राहा,” असं सचिनने ट्विट करुन सांगितलं आहे. तसेच आज २ एप्रिल असल्याने त्याने २०११ साली विश्वचषक जिंकल्याच्या आठवणींना उजाळा देणारं एक वाक्यही या ट्विटमध्ये लिहिलं आहे. “सर्व भारतीय आणि संघ सहकाऱ्यांचं विश्वचषक विजयाला १० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन,” असं सचिनने म्हटलं आहे.
२७ मार्च रोजी सचिनने केलेल्या ट्विटमध्ये, कोरोनापासून सुरक्षित राहण्यासाठी मी नेहमीच सर्व नियम पाळत काळजी घेत होते. तसेच मी अनेकदा चाचण्याही केल्या होत्या. मात्र आज माझी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. मला मध्यम स्वरुपाची लक्षणं दिसत आहेत. मी स्वत:ला घरीच क्वारंटाइन केलं आहे. तसेच माझ्या डॉक्टरांनी दिलेल्या सर्व सुचनांचे मी पालन करत आहे,” असं म्हटलं होतं. तसेच “मला आणि देशातील अनेकांना पाठिंबा देणाऱ्या आरोग्यसेवेतील सर्वांचे मी आभार मानतो”, असं म्हणत त्यांनी आरोग्यसेवेतील कर्मचाऱ्यांचे आभार मानले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.