एकाच गावातील चार मुलांचा तलावात बुडून मृत्यू, गुरे चारायला गेली अन परतलीच नाहीत

राजस्थानच्या अजमेर जिल्ह्यातून अत्यंत धक्कादायक बातमी समोर आली आहे. अजमेर जिल्ह्यातील पिसांगन पोलीस स्टेशन हद्दीत एका तलावात बुडून चार निष्पाप मुलांचा मृत्यू झाला आहे. एकाच वेळी चार मुलांचा मृत्यू झाल्याच्या या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे.

ही घटना काल मंगळवारी घडली. मंगळवारी गुरे चारत असलेल्या चार निरागस बालकांचा तलावात बुडून मृत्यू झाला. मंगळवारी रात्री उशिरा अपघाताची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि ग्रामस्थ घटनास्थळी पोहोचले. त्यांनी जेसीबी मशिनच्या साह्याने तलावाचा पाल तोडून पाण्याचा निचरा सुरू केला. नंतर याठिकाणी मुलांचा शोध घेतला.पीसांगनच्या उपविभागीय अधिकारी प्रियंका बडगुर्जर यांनी सांगितले की, अजमेरहून आलेल्या एसडीआरएफच्या पथकाने काढत बचावकार्य सुरू केले. रात्री 12.30 वाजता नालीतून चारही मुलांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश आले. मृतदेह पाण्यातून बाहेर काढल्यानंतर पीसांगन शवागारात आणण्यात आले. तेथे आज शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. मुलांचे मृतदेह पाहून त्यांच्या कुटुंबीयांनी मोठा आक्रोश केला.

या दुर्घटनेत मरण पावलेल्या चार मुलांचे वय 13 ते 15 वयोगटातील आहे. गोपाल, भोजराज, सोनाराम आणि लेखराज अशी त्यांची नावे आहेत. तसेच ते याच गावातील रहिवासी आहेत. चारही मुले गुरे चारण्यासाठी जंगलात गेली होती. गुरे चरत असताना ते एकाच वेळी तलावात अंघोळ करायला खाली उतरली. मात्र, यानंतर बराच वेळ झाला तरी ते घरी आले नसल्याने कुटुंबीयांना काहीतरी अनुचित प्रकार घडण्याची भीती वाटत होती.

गावकऱ्यांसह त्यांच्या नातेवाइकांनी त्यांचा शोध घेत जंगलाकडे धाव घेतली. तेथे भडसुरी हद्दीत असलेल्या तलावाच्या काठावर मुलांचे कपडे पडलेले त्यांना आढळून आले. त्यामुळे कुटुंबीय आणि ग्रामस्थांची चिंता वाढली. मात्र, ते न सापडल्याने प्रथम त्यांच्या स्तरावर शोध घेतला मात्र ते न सापडल्याने त्यांनी पोलीस प्रशासनाला माहिती दिली.

एकाच गावातील चार मुलांचा मृत्यू झाल्याने शोककळा पसरली आहे. गावकऱ्यांना रात्रभर झोप न आल्याने ते तलावाजवळ बसले. मुलांना शोधण्यासाठी गावकऱ्यांनीही बचाव पथकाला खूप मदत केली. नंतर मुलांचे मृतदेह पाहून एकच आक्रोश करण्यात झाला. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.