दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा अवघ्या दोन महिन्यांवर आल्या आहेत. तर महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षाही येणार आहेत. अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांकडे खूप कमी वेळ उरला आहे. इतक्या कमी वेळेत अभ्यास होणार कसा? असं टेन्शन विद्यार्थ्यांना आलं आहे. मात्र आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स देणार आहोत ज्यामुळे अवघ्या एक महिन्यात तुमचा संपूर्ण अभ्यास होऊ शकेल. अर्थात यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल. चला तर मग जाणून घेउया.
स्ट्रॉंग टाइम टेबल बनवणं आवश्यक
कोणत्याही परीक्षेत यशस्वी होण्यासाठी स्मार्ट वेळापत्रक बनवणं गरजेचं आहे. ते बनवताना, तुमचा संपूर्ण अभ्यासक्रम त्यात समाविष्ट केला जाऊ शकतो हे लक्षात ठेवा. बहुतेक उमेदवार परीक्षेच्या दोन-तीन महिन्यांपूर्वी संपूर्ण अभ्यासक्रम कव्हर करतात, जर तुम्हाला शेवटच्या क्षणाची तयारी करायची असेल तर तुम्ही प्रभावी आणि धोरणात्मक धोरण अवलंबून चांगली मार्क्स घेऊ शकता.
टाइम मॅनेजमेंट महत्त्वाचं
विद्यार्थ्यांनी कमकुवत विषयांचे विश्लेषण करून नवीन वेळापत्रक तयार करणं सर्वात महत्त्वाचं आहे. वेळ वाया न घालवता यावर काम सुरू करणं अभ्यास सुरु करणंही महत्त्वाचं आहे. सर्व विषयांकडे समान लक्ष देण्याची गरज आहे आणि त्यामुळे उरलेल्या वेळेचा हुशारीने वापर करता येऊ शकेल. म्हणूनच टाइम मॅनेजमेंट स्किल्स असणं आवश्यक आहे. कुठेही वेळेचा दुरुपयोग होणार नाही याकडे लक्ष देणं आवश्यक आहे.
ध्येयावर लक्ष केंद्रित करा
कोणत्याही परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवाराला अभ्यास करतानाच त्याच्या निकालाची कल्पना येते. परीक्षेची तयारी करताना स्वतःसाठी एक ध्येय निश्चित करा आणि त्यावर लक्ष केंद्रित करा. जेव्हा तुम्ही ध्येयाप्रती गंभीर असाल, तेव्हा तुम्ही त्यानुसार तयारी करू शकाल.
ऑनलाइन मॉक टेस्ट देत राहा
कोरोनाव्हायरस संसर्गामुळे बहुतेक राज्यांमधील शैक्षणिक संस्था बंद करण्यात आल्या आहेत. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमची संपूर्ण तयारी स्वयंअभ्यासाच्या आधारे करावी लागेल. अशा परिस्थितीत ऑनलाइन मॉक टेस्ट देणं हा उत्तम पर्याय आहे.