अश्विनने टीम इंडियाला विजय मिळवून देत केला विक्रम, 34 वर्षांपूर्वीचं रेकॉर्ड मोडलं
बांगलादेशविरुद्धच्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताच्या आर अश्विनने महत्त्वाची खेळी साकारली. या खेळीच्या जोरावर भारताने दुसऱ्या सामन्यात विजय मिळवून मालिका जिंकली. आर अश्विनने त्याच्या या खेळीसह 34 वर्षे जुना विक्रमही मोडला. 9 व्या क्रमांकावर सर्वात मोठी खेळी करणारा फलंदाज बनला आहे.
आर अश्विनने बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या सामन्यात नाबाद 42 धावा केल्या. यासह त्याने कसोटीत यशस्वी पाठलाग करताना 9 व्या किंवा त्याहून खालच्या क्रमांकावर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम नावावर नोंदवला. याआधी 1988 मध्ये वेस्ट इंडिजच्या विन्स्टन बेंजामिनने पाकिस्तानविरुद्ध नाबाद 40 धावांची खेळी केली होती. अश्विनने त्याच्यापेक्षा दोन धावा जास्त केल्या आहेत.
खडसेंनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला की त्यांच्याकडून घेतला?
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चौकशी होईपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्याकडून करण्यात आली आहे. यावरून भाजप नेते आणि मंत्री गिरीश महाजन यांनी एकनाथ खडसे यांना टोला लगावताना मोठं वक्तव्य केलं आहे. एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी स्वतः मंत्रिपदाचा राजीनामा दिला नव्हता तर त्यांच्याकडून घेण्यात आला होता, असं स्फोटक विधान मंत्री गिरीश महाजन यांनी केलं आहे. आता एकनाथ खडसे गिरीश महाजन यांच्या टीकेला काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तुनिषा शर्मावर या दिवशी होणार अंत्यसंस्कार
अभिनेत्री तुनिषा शर्माच्या आत्महत्येने सध्या सगळीकडे खळबळ माजली आहे. तिच्या आत्महत्येनंतर वेगवेगळी माहिती समोर येत आहे. तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात पोलीस एक्शन मोडमध्ये आले आहेत. पोलिसांनी टुनिषाचा सहकलाकार असलेला तिचा बॉयफ्रेंड शिझान मोहम्मद खानला ताब्यात घेतलं आहे. आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. तुनिषा वर आज अंत्यसंस्कार होणार नाहीत अशी माहिती नातेवाईकांनी दिली आहे.
अभिनेत्री तुनिषा शर्मा मृत्यूप्रकरणी पोलिस तपास सुरू असून त्यामुळे अभिनेत्रीचे अंतिम संस्कार होऊ शकले नाहीत. आता अभिनेत्रीचे नातेवाईक पवन शर्मा यांनी माहिती दिली आहे की तुनिषा शर्मा यांच्यावर 27 डिसेंबर रोजी मीरा रोड परिसरात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
50 फुटांवर गेल्यावर पॅराशूट तुटलं अन्.. गुजरातमध्ये कोरियन व्यक्तीचा हृदयद्रावक मृत्यू
पॅराग्लायडिंग हा साहसी खेळ आहे. इथं एक चूक तुमचा जीव घेऊ शकते. याचा प्रत्यय गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील लोकांना आला. येथे रविवारी एक हृदयद्रावक अपघात झाला. विसतपुरा गावातील शाळेच्या मैदानात पॅराग्लायडिंग करताना कोरियातील एका 50 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास तो 50 फूट उंचीवरून जमिनीवर पडला. शिन ब्योंग मून अशी मृताची ओळख पटली आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील समोर आला आहे.
कडी पोलीस ठाण्याचे निरीक्षक निकुंज पटेल यांनी सांगितले की, मून हवेत 50 फूट उंचीवर असताना त्याच्या पॅराग्लायडरची छत नीट उघडली नाही आणि त्याचा त्यावरचा ताबा सुटला. तो खाली पडताच मूनचे मित्र त्याच्याकडे गेले तेव्हा त्यांनी पाहिले की तो जवळजवळ बेशुद्ध पडला होता. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
खोल समुद्रात बर्निंग बोटीचा थरार; 8 मच्छिमार थोडक्यात वाचले
सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी हद्दीत मासेमारी करणाऱ्या एका बोटीने अचानक पेट घेतल्याची घटना घडली आहे. पुण्यश्री असे या बोटीचे नाव आहे. या बोटीवर एकूण आठ खलाशी होते. त्यांना सुखरूप दुसऱ्या मच्छिमाऱ्यांच्या बोटीमध्ये स्थलांतरीत करण्यात आलं. या घटनेत जीवितहानी झाली नाही, मात्र बोटीचं मोठ्याप्रमाणात नुकसान झालं आहे. आगीच्या घटनेची माहिती मिळताच तातडीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करण्यात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
“शिंदे गटाचे २० आमदार भाजपात सामील होतील”, फडणवीसांच्या ‘ट्रॅप’बद्दल सुषमा अंधारेंचं मोठं विधान!
शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भारतीय जनता पार्टीच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे. येत्या काळात शिंदे गटाचे ४० पैकी २० आमदार भाजपात सामील झाले तर नवल वाटून घेऊ नका, असं विधान सुषमा अंधारेंनी केलं आहे. हा भाजपाचा ट्रॅप आहे, असंही अंधारे म्हणाल्या. पंढरपुरात पत्रकारांशी संवाद साधताना सुषमा अंधारेंनी हे विधान केलं आहे.भारतीय जनता पार्टीच शिंदे गटाला संपवण्याचा प्रयत्न करत आहे, हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना समजत नाही. शिंदे गटाचे ४० पैकी २० आमदार फोडून भाजपाला स्वत:चा पक्ष मोठा करायचा आहे. येत्या काळात देवेंद्र फडणवीस पंतप्रधानपदासाठी थेट नरेंद्र मोदींनाही आव्हान देतील, अशी खोचक टिप्पणी शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी केली.
रितेश देशमुखने पत्रकारांसमोर मागितली जाहीरपणे माफी
अभिनेता रितेश देशमुख आणि जिनिलीया देशमुख यांचा वेड हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामुळे ते दोघेही सातत्याने चर्चेत आहेत. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचा टीझर, गाणी प्रदर्शित झाली आहेत. या चित्रपटाच्या टीझरमध्ये रितेश व जिनिलीयाची केमिस्ट्री पाहून प्रेक्षक थक्क झाले. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ते दोघेही कोल्हापुरात महालक्ष्मीच्या दर्शनासाठी गेले होते. यावेळी रितेश देशमुखच्या मीडिया आयोजकांकडून पत्रकारांना हीन दर्जाची वागणूक देण्यात आली, असा आरोप केला जात आहे. त्यावर रितेश देशमुखने स्पष्टीकरण दिले आहे.
टी२० संघातून केएल राहुलचा गुंडाळला जाणार गाशा , चेतन शर्माच निवडणार श्रीलंका मालिकेसाठी संघ
भारतीय संघाला पुढील वर्षाच्या सुरुवातीला श्रीलंकेविरुद्ध मालिका खेळायची आहे. सध्या या मालिकेसाठी टीम इंडियाची निवड करण्यासाठी निवड समिती स्थापन करण्यात आलेली नाही. दरम्यान, चेतन शर्माची काळजीवाहू निवड समिती या मालिकेसाठी संघ निवडणार असल्याचे वृत्त आहे. या मालिकेत हार्दिक पांड्या संघाचे नेतृत्व करू शकतो. जाण्यापूर्वी चेतन शर्मा केएल राहुल सहित कोणाकोणाला धक्का देतात ते पाहणे महत्त्वाचे असेल.भारत आणि श्रीलंका यांच्यात ३ जानेवारीपासून मालिका सुरू होणार आहे. चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती संघाची निवड करेल कारण बीसीसीआयच्या सूत्रांनुसार नवीन पॅनल एका आठवड्यात जाहीर होणार नाही. क्रिकेट सल्लागार समिती २६ ते २८ डिसेंबर दरम्यान निवड समितीसाठी शॉर्टलिस्ट केलेल्या स्पर्धकांची मुलाखत घेईल अशी अपेक्षा होती. बीसीसीआयच्या एका सूत्राने नाव न सांगण्याच्या अटीवर पीटीआयला सांगितले की, “जुनी समिती कदाचित श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेसाठी संघाची निवड करेल.”
SD Social Media
9850 60 3590