बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.सध्या अभिनेत्री तिची मुलगी राहा कपूरसोबत वेळ घालवत आहे.आई झाल्यानंतर ती अनेकदा तिचे फोटो शेअर करत असते. या फोटोंद्वारे ती तिच्या चाहत्यांना सांगत असते की ती कशी मातृत्वाचा आनंद घेत आहे.अलीकडे तिनं व्यायाम आणि योगासनं सुरू केली आहेत. याचा एक फोटोही तिनं इन्स्टाग्रामवर शेअर केला होता.
आलिया लवकरच कामावर परतणार आहे.आलिया भट्ट लवकरच चित्रपट निर्माता संजय लीला भन्साळी यांच्या ‘बैजू बावरा’ चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करू शकते, असं सांगितलं जात आहे.आलिया भट्ट आणि संजय लीला भन्साळी यांचा हा दुसरा चित्रपट आहे. याआधी आलियाने संजय लीला भन्साळी दिग्दर्शित गंगूबाई काठियावाडी या चित्रपटात काम केलं होतं.राहाच्या जन्मानंतर केवळ तीन महिन्यांनीच आलिया पुन्हा बॅक टू वर्क पहायला मिळणार आहे.