India@75 : भारतीय ध्वजाची निर्मिती कशी झाली? अनेकदा बदलली ‘तिरंगा’ची डिझाईन

15 ऑगस्ट 1947 रोजी स्वातंत्र्य मिळाल्यापासून भारतात दरवर्षी या तारखेला स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. यंदा 76 वा स्वातंत्र्योत्सव साजरा केला जाणार आहे. त्यासाठी देशभरात जोरदार तयारी सुरू आहे. या निमित्ताने केंद्र सरकारने घरोघरी तिंरगा ही मोहीम सुरू केली आहे. प्रत्येक देशाचा स्वतःचा ध्वज असतो. भारतीय ध्वजाला ‘तिरंगा’  म्हणतात कारण त्यात भगवा, पांढरा आणि हिरवा असे तीन रंग वापरले आहेत. हा ध्वज भारतात सुरुवातीपासून फडकवला गेला नसला तरी. पूर्वी त्याची रचना दुसरी होती. जाणून घ्या ‘तिरंगा’ कसा निर्माण झाला.

यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहोत. भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी असंख्य देशवासीयांना प्राणांची आहुती दिली. तर अनेकांनी आपलं साहित्य, गीत आणि केलेच्या माध्यमातून देशप्रेम जागृत केलं. अशीच आपल्या ध्वजाची देखील कहाणी आहे. आजचा आपला ध्वजाआधी अनेक प्रकारचे ध्वज तयार करण्यात आले होते.

सध्याचा तिरंगा कधी स्वीकारण्यात आला?

22 जुलै 1947.

कोणत्याही राष्ट्राचा ध्वज कशाचे प्रतीक आहे?

अभिव्यक्ती आणि स्वातंत्र्य.

भारताचा पहिला ध्वज कधी आणि कोणी बनवला?

1904 मध्ये, विवेकानंदांच्या शिष्या सिस्टर निवेदिता यांनी प्रथम ध्वज बनवला, ज्याला निवेदिता ध्वज म्हणतात.

पहिल्यांदा तिरंगा कधी आणि कोणी बनवला?

1906 मध्ये बंगालच्या फाळणीच्या निषेधार्थ काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शचिंद्रकुमार बोस यांनी प्रथमच तीन रंगांचा झेंडा हातात घेतला होता. या ध्वजात वरच्या बाजूला भगवा, मध्यभागी पिवळा आणि तळाशी हिरवा रंग वापरण्यात आला होता.

परदेशात प्रथमच भारतीय ध्वज कधी फडकवण्यात आला?

1908 मध्ये भिकाजींनी जर्मनीत तिरंगा ध्वज फडकावला होता. त्यात वरच्या बाजूला हिरवा, मध्यभागी भगवा आणि तळाशी लाल रंग होता. हा ध्वज भिकाजी कामा, वीर सावरकर आणि श्यामजी कृष्ण वर्मा यांनी संयुक्तपणे तयार केला होता.

भारताच्या वर्तमान ध्वजाची रचना कोणी केली?

सध्याच्या भारतीय राष्ट्रध्वजाची रचना पिंगली व्यंकय्या यांनी केली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.