‘‘प्रस्तावित राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून देशात प्रथमच दूरदर्शी आणि भविष्याभिमुख शिक्षणव्यवस्था तयार केली जात आहे. आपल्या आधीच्या सरकारांनी ‘गुलामगिरीच्या मानसिकते’मुळे देशाचे हरपलेले वैभव परत मिळवण्यासाठी काहीही केले नाही,’’ असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शनिवारी केला.
राजकोट येथील श्री स्वामीनारायण गुरुकुलाच्या ‘अमृत महोत्सवा’त दूरदृश्य प्रणालीद्वारे मोदी बोलत होते. त्यांनी सांगितले, की २०१४ नंतर आपले सरकार सत्तेवर आल्यानंतर देशातील आयआयटी, आयआयएम आणि वैद्यकीय महाविद्यालयांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.भारताच्या प्राचीन गुरुकुल पद्धतीची प्रशंसा करताना मोदी म्हणाले, की ज्ञान हे जीवनाचे सर्वोच्च उद्दिष्ट आहे. संत व आध्यात्मिक नेत्यांनी शिक्षण क्षेत्रातील देशाचे हरवलेले वैभव पुनरुज्जीवित करण्यास मदत केली.