नोटाबंदीनंतर सरकारने गावा-गावात डिजिटल प्रणालीचा वापर व कॅशलेस व्यवहार करण्याचे धोरण अंगीकारले. त्यानंतर कॅशलेस व्यवहार वाढले आहेत. जे आधीपासून काही बाबतीत हे व्यवहार करीत होते ते आता अधिक प्रमाणात करू लागले आहेत. कॅशलेस व्यवहाराचे फायदे असले तर काही तोटे देखील आहेत. चालू वर्षात 251 ऑनलाईन फ्रॉडच्या तक्रारी सायबर विभागाकडे प्राप्त आहेत. यात एकूण 89 गुन्हे दाखल झाले असून यातील 47 गुन्हे सायबर विभागाकडे तपासाला आली आहेत. तर मागील सात महिन्यात विविध प्रकरणात 1 कोटी 37 लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीची नोंद आहे.
आधुनिकतेच्या काळात आता गुगल पे, फोन पे, नेट बँकिंग, याच्या माध्यमातून पैशाचे व्यवहार केले जात आहेत. पूर्वीच्या काळी असे तंत्रज्ञान उपलब्ध नव्हते. आवश्यक तेवढे पैसे खिशात बाळगावे लागत होते. मग गर्दीच्या ठिकाणी पाकीटमारीच्या घटना समोर यायच्या. आता चहाच्या टपरी पासून ते पंचतारांकित हॉटेलपर्यंत ऑनलाइन पेमेंट होऊ लागले आहे. परिणामी पाकीटमारीच्या घटना कमी झाल्या आहेत.
ऑनलाईन व्यवहारामुळे बँक खाते रिकामे
आज केळीच्या गाड्यापासून ते मोठ्या व्यापाऱ्यांपर्यंत ऑनलाइन व्यवहार होत आहेत. यामध्ये प्रामुख्याने फोन पे, गुगल पे, पेटीएम, ऑनलाइन बँकिंग असे वेगवेगळे ॲप उपलब्ध आहेत. सर्वत्र कॅशलेस व्यवहार होत असल्याने खिशात पैसे ठेवण्याची गरज कमी पडत आहे. मात्र, ऑनलाईन व्यवहारामुळे बँक खाते रिकामे झाल्याचेही अनेक प्रकरणे होत आहेत.
1 कोटी 37 लाख रुपयांच्या फसवणूक
चालू वर्षात 251 ऑनलाईन फ्रॉडच्या तक्रारी सायबर विभागाकडे प्राप्त आहेत. यात एकूण 89 गुन्हे दाखल झाले असून यातील 47 गुन्हे सायबर विभागाकडे तपासाला आली आहेत. तर मागील सात महिन्यात विविध प्रकरणात 1 कोटी 37 लाख रुपयांच्या आर्थिक फसवणुकीची नोंद आहे. ग्रामीण भागात ऑनलाईनच्या माध्यमातून गंडा घालण्याच्या घटनांमध्ये वाढ होऊ लागली आहे. यासाठी बीड जिल्ह्यातील सायबर विभाग ऍक्शन मोडमध्ये आला असून धडक कारवाई सुरू केली आहे.