आशिया कपमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाचा 5 विकेटने रोमांचक विजय झाला. हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि रवींद्र जडेजा टीम इंडियाच्या या विजयाचे शिल्पकार ठरले. मागच्या वर्षी टी-20 वर्ल्ड कपमध्ये झालेल्या मानहानीकारक पराभवानंतर टीम इंडियाने पाकिस्तानविरुद्ध बदला घेतला आहे.
टीम इंडियाचा हा सामना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही पाहत होते. भारताच्या या थरारक विजयानंतर शरद पवारांनीही सेलिब्रेशन केलं. सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर शरद पवारांच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ टाकला आहे. आनंदी रविवार केल्याबद्दल टीम इंडियाचे धन्यवाद, असं कॅप्शन सुप्रिया सुळेंनी या व्हिडिओला दिलं आहे.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला, यानंतर भारताने पाकिस्तानचा संघाला 147 रनवर ऑल आऊट केला. भुवनेश्वर कुमारने 4, हार्दिक पांड्याने 3, अर्शदीप सिंगने 2 तर आवेश खानने 1 विकेट घेतली.