‘भारत जोडो’ यात्रेत व्यग्र असणाऱ्या राहुल गांधींची संसदेत केवळ ५३ टक्के उपस्थिती

काँग्रेस खासदार राहुल गांधी मागील काही दिवसांपासून ‘भारत जोडो’ यात्रेचं नेतृत्व करत आहेत. ही यात्रा सध्या राजधानी दिल्लीत पोहोचली आहे. भारत जोडो यात्रेत व्यग्र असणाऱ्या राहुल गांधींनी संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला दांडी मारली आहे. त्यांची संसदेतील उपस्थिती अवघी ५३ टक्के इतकी आहे. इतर खासदारांची संसदेतील सरासरी उपस्थिती ७९ टक्के आहे. राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघाचे खासदार आहेत. केरळमधील खासदारांची संसदेतील सरासरी उपस्थिती ८४ टक्के आहे.

पीआरएसने (PRS Legislative Research) २१ डिसेंबरपर्यंत संकलित केलेल्या आकडेवारीनुसार, राहुल गांधींची संसदेतील उपस्थिती सरासरी खासदारांच्या उपस्थितीच्या तुलनेत खूप कमी आहे. १७ व्या लोकसभा निवडणुकीत निवडून आल्यानंतर राहुल गांधींनी पाच चर्चासत्रात सहभाग घेतला. राष्ट्रीय स्तरावरील खासदारांच्या तुलनेत हा आकडा ३९.७ टक्के आहे. या कालावधीत त्यांनी ८६ प्रश्न विचारले. मागील दोन लोकसभा कार्यकाळाच्या तुलनेत हा आकडा मोठा आहे, असं PRS च्या आकडेवारीवरून स्पष्ट होतं.

१६ व्या लोकसभेत (२०१४-१९) राहुल गांधींची संसदेतील उपस्थिती जवळपास तेवढीच होती. त्यावेळी ते उत्तर प्रदेशातील अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत होते. त्यांची उपस्थिती ५२ टक्के होती. उत्तर प्रदेशमधील खासदारांची सरासरी उपस्थिती ८६ टक्के इतकी होती. दरम्यानच्या कालावधीत राहुल गांधींनी १४ चर्चासत्रात भाग घेतला. पण त्यांनी एकही प्रश्न विचारला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.