खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात NIA ‘अ‍ॅक्शन’मोडमध्ये; देशभरात १४ ठिकाणी छापेमारी

राष्ट्रीय तपास यंत्रणा अर्थात एनआयएने देशातील १४ वेगवेगळ्या ठिकाणी छापेमारी केली आहे. पंजाब, जम्मू-काश्मीर आणि दिल्ली या भागात हे छापे टाकण्यात आले आहेत. एनआयएने बब्बर खालसा इंटरनॅशनल, इंटरनॅशनल शीख यूथ फेडरेशन आणि इतर खलिस्तानी दहशतवादी संघटनांच्या सदस्यांच्या ठिकाणांवर शोधमोहीम राबवली.

या छापेमारीत एनआयएला संवेदनशील कागदपत्रे मिळाली आहेत. खलिस्तानी दहशवाद्यांकडून पंजाबमध्ये दहशत पसरवून वातावरण बिघडवण्याचा मोठा कट रचण्याचा प्रयत्न केला जात होता. तसेच आंतरराष्ट्रीय सीमा ओलांडून शस्त्रे, दारूगोळा, स्फोटके आदि दहशतवादी उपकरणांची तस्करी केली जात होती. ही शस्त्रे दहशतवादी कृत्यात सहभागी असणाऱ्या सदस्यांना आणि कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचवली जात होती. यामध्ये टार्गेट किलिंगचाही समावेश आहे, अशा गुन्हेगारी कृत्यांच्या पार्श्वभूमीवर एएनआयने छापेमारी केली.

‘एनआयए’ने दिलेल्या माहितीनुसार, सीमाभागातून दहशतवादी आणि गुंडांना शस्त्रे, स्फोटकं आणि पैशांचा पुरवठा केला जात होता. या स्फोटकांच्या मदतीने हे दहशतवादी आणि गुंड देशाच्या विविध भागात दहशतवादी कारवाया करत होते. एवढेच नाही तर ते देशाच्या अनेक भागात टार्गेट किलिंगचे कटही रचत होते. एनआयएने २० ऑगस्ट २०२२ रोजी गुन्हा नोंदवला होता. याच प्रकरणी एएनआयने छापेमारी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.