कालीचरण महाराज यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. ’60 टक्के हिंदू महिला मतदान करत नाहीत, त्यामुळे येणाऱ्या काळात तुम्हाला मुस्लिम व्हाव लागले. आपलं राहणीमान आणि मुस्लिमांचं राहणीमान यामध्ये खूप अंतर आहे. आपल्या देशात 140 कोटी जनता आहे, त्यामध्ये 94 कोटी हिंदू तर 46 कोटी मुस्लिम समाज आहे. त्यामुळे येणाऱ्या दहा वर्षांमध्ये त्यांचा पंतप्रधान होईल, व सर्व हिंदू महिलांना बुरख्यात राहावं लागेल’ असं वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केलं आहे. ते विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने आयोजित शौर्य यात्रेत नांदगाव पेठ येथे बोलत होते.
वाद निर्माण होण्याची शक्यता
पुढे बोलताना कालीचरण महाराज यांनी असंही म्हटलं की, ‘आपले सर्व देवी देवता हिंसक आहेत. मारामाऱ्या करणारे आहेत, म्हणून आपण त्यांची पूजा करतो. त्यामुळे तुम्ही जर खून केला आणि त्याचा उद्देश धर्मासाठी किंवा देशासाठी असेल तर खून करणं देखील वाईट नाही’ दरम्यान आता कालीचरण महाराज यांच्या या वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
यापूर्वीही केलं आहे वादग्रस्त वक्तव्य
दरम्यान यापूर्वी देखील त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल बोलताना वादग्रस्त वक्तव्य केंलं होतं. यावरून कालीचरण महाराज चांगलेच चर्चेत आले होते. कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल केलेल्या अवमानकारण वक्तव्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता.