आज दि.१८ आॕक्टोबर च्या दिवसभरातील ठळक घडामोडी अशा…

शिवसेनेनंतर पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव; रोहित पवारांचा धक्कादायक आरोप

शिवसेना पक्ष फोडल्यानंतर आता विरोधकांचे पुढील टार्गेट राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. यासाठी पवार कुटुंबात फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव असल्याचेही रोहीत पवार म्हणाले. एबीपी माझा या वृत्त वाहिनीला दिलेल्या प्रतिक्रीयेत ते बोलत होते. दरम्यान, यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही प्रतिक्रीया दिली आहे.

संजय राऊत आणि खडसेंची झाली कोर्टामध्ये भेट, नाथाभाऊंच्या हाती पाठवला महत्त्वाचा निरोप

पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणात शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये वाढ झाली आहे. आज कोर्टामध्ये राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे आणि राऊत यांची भेट झाली. यावेळी, मी ओके असून लवकरच बाहेर येणार आहे, असा निरोपच राऊतांनी दिला.आज राऊत यांना पुन्हा एकदा PMLA न्यायालयात हजर केले होते.राऊत यांच्या जामीन अर्जावर सुनावणीसाठी आज कोर्टामध्ये पोहोचले.यावेळी कोर्टाच्या परिसरात राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसे यांच्यासोबत भेट झाली. खडसे बाहेर आल्यानंतर पत्रकारांनी त्यांना काय चर्चा झाली असं विचारलं असता, खडसे म्हणाले की, ‘संजय राऊत हे एकदम ओक्के आहे, सबकुछ ओके आहे. काही चिंता करू नका. मी लवकरच बाहेर येणार आहे.’ अशी माहिती खडसे यांनी दिली.

‘द काश्मीर फाइल्स 2’ येणार भेटीला

  ‘द काश्मीर फाइल्स’ हा चित्रपट रिलीजनंतर प्रचंड चर्चेत आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी केली होती. या चित्रपटावरुन सोशल मीडियावर अनेक वाददेखील निर्माण झाले होते. दरम्यान या चित्रपटाच्या थरारक अनुभवानंतर प्रेक्षक चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची प्रतीक्षा करत आहेत. तत्पूर्वी दिग्दर्शकविवेक अग्निहोत्री यांनी स्वतः चित्रपटाच्या दुसऱ्या भागाबाबत खुलासा केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर ट्विट करत चित्रपटाबाबत मोठी अपडेट दिली आहे.

‘द काश्मीर फाईल्स’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जबरदस्त गल्ला जमवला होता. परंतु फारच कमी लोकांना माहिती असेल, हा चित्रपट बनवण्यासाठी केवळ 15 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. परंतु रिलीजनंतर या चित्रपटाने जबरदस्त कामगीरी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं. 15 कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने अनेक रेकॉर्ड्स मोडीत काढत 340 कोटींचा टप्पा पार केला होता. हा चित्रपट नव्वदच्या दशकात काश्मीरमध्ये पंडितांच झालेलं पलायन आणि त्यांच्यावर झालेले अत्याचार यावर आधारित आहे.

खड्ड्यांमुळे झाला अपघात; तासभर जखमी अवस्थेतच केलं आंदोलन, नवी मुंबईतील खड्डे चर्चेचा विषय

मुंबईसह उपनगरात मागच्या तीन महिन्यांच्या झालेल्या पावसाने रस्त्यांची पार चाळण झाली आहे. ठाणे, बेलापूर, या भागात रस्ते खराब असल्याने अपघाताच्या प्रमाणात वाढ झाली आहे. दरम्यान रस्त्यावर असलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीला मोठा खोळंबा होत आहे. आज (दि.18) एका वाहनधारकाला याचा चांगलाच फटका बसला. ठाणे, बेलापूर रोडवर घणसोली स्थानकाजवळ एका वाहनधारकाचा अपघात झाल्याने त्या तरुणाने चक्क जखमी अवस्थेतच आंदोलन केलं. दरम्यान या तरुणाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच घडला इतिहास, पण वॉर्नरला बसला धक्का!

सध्या सुरू असलेल्या टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेचं विजेपद राखण्यासाठी ऑस्ट्रेलियन टीम कसून तयारी करत आहे. त्यांच्या या तयारीला पहिल्या वॉर्म-अप मॅचमध्ये भारताकडून झालेल्या पराभवानंतर मोठा धक्का बसलाय. वर्ल्ड कपच्या धामधुमीतच क्रिकेट ऑस्ट्रेलियानं एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमचा फास्ट बॉलर पॅट कमिन्सकडे ऑस्ट्रेलियाच्या वन-डे टीमची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.माजी कॅप्टन आरोन फिंचनं 50 ओव्हरच्या फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली आहे.. त्यानंतर कमिन्स याची कॅप्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली असून, तो ऑस्ट्रेलियाचा 27 वा वन-डे कॅप्टन असेल. त्याच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलिया पुढील वन-डे वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत भाग घेणार आहे. कमिन्सकडे ऑस्ट्रेलियाच्या टेस्ट टीमचं नेतृत्वही आहे. दरम्यान, दिग्गज खेळाडू डेव्हिड वॉर्नरनं वन-डे टीमच्या कॅप्टनपदी नियुक्ती व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली होती. मात्र त्याच्या नावाचा विचार करण्यात आला नाही.

केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळले, 6 जणांचा मृत्यू

उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या अपघातात 6 जणांचा मृ्त्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. एका खासगी कंपनीचे हे हेलिकॉप्टर होते. घटनास्थळी पोलीस आणि बचाव पथक पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे.उत्तराखंडमधील केदारनाथमध्ये खराब हवामानामुळे हेलिकॉप्टर कोसळ्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

गोवा-हैदराबाद विमानात अचानक धुराचे लोट; Emergency लँडिंग

मागच्या काही काळात विमान दुर्घटनेत वाढ होताना दिसत आहे. विमान अचानक लँडिंग करण्याच्या घटनामंध्ये वाढ झाली आहे. मागच्या 1 वर्षांत तब्बल 10 ते 11 वेळा विमान काही कारणामुळे तात्काळ लँडिंग करण्याची वेळ आली आहे. दरम्यान काल (दि.17) अशीच एक घटना घडली आहे. गोव्याहून हैदराबादला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानाच्या केबिनमध्ये अचानक धुराचे लोट आल्याने विमान हैदराबाद विमानतळावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. दरम्यान याचे व्हिडिओ आणि फोटो व्हायरल झाले आहेत. दरम्यान याबाबत एअर लाईन कर्मचाऱ्यांनी प्रवाशांवर दबाव टाकत व्हिडिओ डिलीट करण्यास भाग पाडले.

विमानात अचानक धुराचे लोट आल्याने प्रवाशांनी आपल्या फोनमध्ये व्हिडिओ आणि फोटो काढण्यास सुरू केले. यानंतर विमानातील केबीन क्रूने प्रवाशांकडून फोन हिसकावून घेण्यास सुरुवात केली. उलट विमानातील कर्मचारी प्रवाशांना धिर देण्याचे सोडून प्रवाशांना भिती घालण्यात आल्याचा प्रकार घडल्याचे दिसून आल्याचे प्रवाशांनी माहिती दिली. या सगळ्या घटनेत विमानाचे लँडिग सेफ झाल्यनंतर प्रवाशांना इमर्जन्सी एक्झिटमधून खाली उतरवण्यात आले.

एसएस राजामौलींच्या चित्रपटात झळकणार दीपिका

बाहुबली  आणि ‘आरआरआर’ चित्रपटाच्या अफाट यशानंतर, आता एसएस राजामौली त्यांच्या पुढील चित्रपटासाठी चर्चेत आहेत. चाहतेही त्यांच्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. वृत्तांवर विश्वास ठेवला तर राजामौली यांनी त्यांच्या पुढील चित्रपटाचे कामही सुरू केले आहे. चित्रपट निर्मात्याच्या या प्रकल्पाला  तात्पुरते पण विशेष ‘एसएसएमबी29′ असे नाव देण्यात आले आहे. एसएस राजामौली यांचा चित्रपट असेल आणि तो चर्चेत नसेल असे  होऊच  शकत नाही. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हे फिल्ममेकर राजामौली त्यांच्या पुढच्या प्रोजेक्टवर काम करत आहेत. या चित्रपटांमध्ये त्याने मुख्य भूमिकेसाठी साऊथ सुपरस्टार महेश बाबूला कास्ट केल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत या चित्रपटाबाबत एक मोठे अपडेट समोर आले आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर दीपिका पदुकोण या चित्रपटात सुपरस्टार महेश बाबूसोबत दिसणार आहे.

अनिल देशमुखांना दिलासा मिळणार? कोर्टानचं दिलं आश्वासन; 21 ऑक्टोबरला ED करणार युक्तिवाद

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावर मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष सीबीआय कोर्टात 21 ऑक्टोबरला ईडी युक्तिवाद करणार आहे. देशमुख हे गेल्या अकरा महिन्यांपासून मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपांप्रकरणी जेलमध्ये होते. त्यांना ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्याप्रकरणी हायकोर्टाने गेल्या आठवड्यात दिलासा दिला होता. ईडीने अनिल देशमुख यांचा जामीन मंजूर केला होता. पण सीबीआयने त्यांच्या जामीन अर्जाला विरोध केला होता. यावर आता लवकर निर्णय घेण्याची मागणी देशमुख यांच्या वकीलांनी केली आहे

SD Social Media

9850 60 3590

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.