छत्रपती शाहू महाराजांच्या वंशजांचा शिवसेनेत प्रवेश; उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार?

छत्रपती शाहूंचे वंशज आणि माजी आमदार राजवर्धन कदमबांडे यांचे सुपुत्र यशवर्धन कदमबांडे यांनी आज मातोश्री येथे शिवसेना नेते युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या शुभहस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी युवासेना सचिव वरुण सरदेसाई शिवसेनेचे धुळे नंदुरबार जिल्हा संपर्कप्रमुख बबनराव थोरात माजी खासदार सुभाष वानखेडे उपस्थित होते.

यशवर्धन कदमबांडे यांच्या शिवसेना प्रवेशाने भारतीय जनता पक्षाला हादरा बसला असून उत्तर महाराष्ट्रातील राजकीय समीकरण बदलणार आहे. शिवसेनेला एक नवीन दमदार चेहरा मिळाल्याने शिवसैनिकांचे मनोबल वाढणार आहे. राजवर्धन कदमबांडे यांच्याकडे धुळे जिल्ह्यातील महानगरपालिका जिल्हा बँक आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये अनेक वर्षांपासून सत्ता होती. यशवर्धन कदमबांडे यांनी शिवसेनेत प्रवेश केल्याने निश्चितपणे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांना अधिकचे बळ मिळणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

scroll to top
error: आपल्याला माहिती कॉपी करण्याची परवानगी नाही.