निवडणूक हरण्यासाठी विरोधकांनी लिंबू मंतरलं, जिंकल्यानंतर सरपंचाचा 3 हजार लिंबं चिरडून जल्लोष
सांगलीच्या चुडेखिंडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये भानामती करणीचे प्रकार घडला होता, मात्र तरी देखील विरोधी उमेदवार विजय झाला आहे, यानंतर विजयी उमेदवाराने जाहीररीत्या एक-दोन नव्हे तर तब्बल 3 हजार लिंबू आणि त्यावर गुलाल उधळत त्यावरून विजयी मिरवणूक काढली.
दरम्यान हा प्रकार लिंबूचा उतारा असल्याची गावात चर्चा सुरू आहे. मात्र नव्या सरपंचांनी विरोधकांनी केलेल्या भानामतीची निषेध आणि अंधश्रद्धा पायदळी तुडवण्यासाठी लिंबू चिरडल्याचं स्पष्टीकरण दिलं आहे.
बोम्मईंनी पुन्हा महाराष्ट्राला डिवचलं, कर्नाटकच्या विधानसौदात महाराष्ट्राविरोधात ठराव मंजूर
कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मईंनी पुन्हा एकदा महाराष्ट्राला डिवचलं आहे. महाराष्ट्राला एकही इंच जमीन देणार नाही, असा ठराव कर्नाटकच्या विधानसौदात मंजूर करण्यात आलाय. कानडी सरकारनं महाराष्ट्राविरोधात हा ठराव मांडलाय.
सीमा प्रश्नावर अमित शाहांसोबतच्या बैठकीत बोम्मईंनी दिलेला शब्द फिरवलाय. आता कर्नाटकच्या विधानसौंधात महाराष्ट्राला एक इंचही जमीन न देण्याचा ठराव कर्नाटकने केलाय.
भारतात रुग्ण आढळल्यानंतर तज्ज्ञांनी सांगितला खबरदारीचा उपाय
कोरोनाचं सावट संपलंय असं वाटत असताना त्याच्या ओमिक्रॉन BF.7 या स्ट्रेनने चिंता वाढवली आहे. या स्ट्रेनने चीनमध्ये परिस्थिती बिकट झाली आहे. तर, भारतातही याचे तीन रुग्ण आढळले आहेत. गुजरातमध्ये ऑक्टोबरच्या सुरुवातीला पहिला रुग्ण आढळला होता. त्यानंतर दुसराही रुग्ण तिथेच आढळला आहे. तर, एक रुग्ण ओडिशामध्ये सापडला आहे.
देशातील परिस्थिती सामान्य असली तरी ओमिक्रॉनचा नवा व्हेरियंट खूप वेगाने पसरत असल्याने चिंता वाढली आहे. हा विषाणू येत्या तीन महिन्यांत चीनमधील 60% लोकांना संक्रमित करेल, असं म्हटलं जातंय. विषाणूची संक्रमणक्षमता पाहता भारतातही नवीन कोविड लाट येऊ शकते का? याबद्दल तज्ज्ञांनी त्यांचं मत नोंदवलं आहे. या संदर्भात ‘हिंदुस्थान टाईम्स’ने वृत्त दिलंय.
देशात मास्कसक्ती अटळ? खुद्द पंतप्रधान मोदी घालून आले मास्क
चीनसोबतच जपान, दक्षिण कोरिया आणि अमेरिकेमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. जगात पुन्हा एकदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारत सरकार सतर्क झाले आहेत. आजपासून संसदेत आणि संसद परिसरात मास्कची सक्ती करण्यात आली आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मास्क घातल्याचं पहायला मिळालं. लोकसभेचं कामकाज सुरू असताना सर्व खासदारांनी मास्कचा वापर करावा असं आवाहन लोकसभा अध्यक्षांकडून करण्यात आलं आहे.
मुक्ता टिळक यांना देवेंद्र फडणवीसांनी अर्पण केली श्रद्धांजली
पुण्यातील कसबा विधानसभा मतदारसंघातील भाजपा आमदार आणि पुण्याच्या माजी महापौर मुक्ता टिळक यांचे आज (गुरुवार) निधन झाले. मागील काही दिवसांपासून त्या कर्करोगाने आजारी होत्या. त्यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांच्या निधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शोक व्यक्त केला आहे.
रिलायन्स उद्योग समूहाकडून ‘मेट्रो इंडिया’चे अधिग्रहण
रिलायन्स उद्योग समूहाची उपकंपनी असलेल्या रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) कडून जर्मन रिटेलर मेट्रो कॅश आणि कॅरी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. २२ डिसेंबर रोजी याबाबतचा करणार करण्यात आला असून हा करार २८५० कोटी रुपयांमध्ये करण्यात आल्याची माहिती रिलायन्स उद्योग समूहाकडून जारी प्रसिद्धीपत्रकारद्वारे देण्यात आली आहे. ‘मेट्रो इंडिया’ कंपनी खरेदी केल्यानंतर ‘रिलायन्स रिटेल’ची आता डीमार्ट (D-Mart) आणि हायपर मार्केटशी थेट स्पर्धा असणार आहे.
टीम इंडियाच्या ‘विदर्भ एक्स्प्रेसने’ भारताचे महान क्रिकेटपटू विनू मांकड यांचा मोडला विक्रम
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरा कसोटी सामना गुरुवारी (२२ डिसेंबर) मिरपूरमध्ये सुरू झाला. बांगलादेश संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण त्यांचे फलंदाज अपेक्षित कामगिरी करू शकले नाहीत. भारताच्या भेगत गोलंदाजीपुठे बांगलादेशचा संपूर्ण संघ अवघ्या २२७ धावांवर गुंडाळला गेला. उमेस यादव आणि रविचंद्रन अश्विन यांनी सामन्याच्या पहिल्या डावात सर्वोत्कृष्ट गोलंदाजी करत विरोधकांना स्वस्तात गुंडाळले.
याच दुसऱ्या कसोटी दरम्यान भारताची विदर्भ एक्स्प्रेस अशी ओळख असणाऱ्या वेगवान गोलंदाज उमेश यादवने महान खेळाडू विनू मांकड यांचा विक्रम मोडला. बांगलादेशविरुद्ध मिरपूर येथे सुरू असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वेगवान गोलंदाज उमेश यादवने शानदार गोलंदाजी करत इतिहास रचला. उमेशने महान विनू मांकड यांना मागे टाकून कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक बळी घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत तेराव्या स्थानावर पोहोचला आहे.
SD Social Media
9850 60 3590