शालेय विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा यासाठी त्यांना आधुनिक शिक्षण दिले जाते. तसेच विविध उपक्रमांतून त्यांना शिक्षणाचे धडे दिले जातात. बीड जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्येही विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम हाती घेतले जातात. तसेच विविध सामाजिक संस्थाही त्यासाठी कार्यरत असतात.शिरूर तालुक्यातील आर्वी येथील शांतीवन प्रकल्प मागील 22 वर्षांपासून काम करत आहे. आता फाली उपक्रमाच्या अंतर्गत शालेय विद्यार्थ्यांसाठी एक चांगला उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
विद्यार्थ्यांमध्ये शेतीची आवड निर्माण व्हावी यासाठी फाली उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांना आधुनिक शेतीचे धडे दिले जात आहेत.शांतीवन प्रकल्प जैन इरिगेशन संस्थेच्या सहकार्याने फाली उपक्रम सुरू केला आहे. यामध्ये शेडनेटमध्ये विविध प्रकारची पिके घेतली जात आहेत.फाली उपक्रम 135 शाळा तसेच गुजरात राज्यातील 20 शाळांमध्ये यशस्वीरित्या राबवण्यात येत आहे. विद्यार्थ्यांकडून शेतीविषयक प्रात्यक्षिके देखील करवून घेतली जातात.शांतीवन मागील अनेक वर्षांपासून शेतकऱ्यांसाठी आणि शेती विषयी काम करत आहे. यातच फाली उपक्रमाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना शेतीविषयक अधिक माहिती दिली जाते.
फाली उपक्रमात विद्यार्थ्यांकडून प्रात्यक्षिक देखील करून घेतले जात आहेत, अशी माहिती शांतीवन प्रकल्प संस्थापक दीपक नागरगोजे यांनी दिली.