राज्यात थंडीचा जोर पाहायला मिळत आहे. त्यामुळे औरंगाबादचा पारा घसरला असून तापमान 9.2 अंशावर आले आहे. यानिमित्ताने यंदाच्या हिवाळ्यातील सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आले. वाढलेल्या थंडीमुळे जिल्ह्यात थंडीची लाट नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसत आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यात कडाक्याच्या थंडीची लाट पाहायला मिळत असून, नागरिक शेकोट्यांचा आधार घेताना दिसून येत आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागामध्ये सर्वात जास्त थंडी अनुभवायला मिळत आहे. रब्बी पिकांना शेतकरी पाणी भरत असल्यामुळे ही थंडीची लाट अजून जास्त ग्रामीण भागामध्ये पाहायला मिळते.
मागच्या वर्षी हा पारा 12 खाली आलाच नाही. तर 21 डिसेंबरला सर्वात कमी म्हणजे 10.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली होती. यावर्षी नोव्हेंबरमध्येच तापमान सरासरीच्या 5 अंशांनी कमी नोंदले गेले आहे. साधारणत: नोव्हेंबरच्या तुलनेत डिसेंबरमध्ये जास्त थंडी जाणवते. मात्र, यावर्षी नोव्हेंबरमध्ये थंडीचा पारा वाढल्याचे पाहायला मिळत आहे.
राज्यातील इतर ठिकाणचे तापमान –
निफाड -7.0, जळगाव -8.2, पुणे -8.8, औरंगाबाद -8.9, नाशिक -9.2, यवतमाळ -10.0, महाबळेश्वर -10.4, जालना -11.6, बुलडाणा -11.6, अमरावती -11.7, उस्मानाबाद -12, अकोला -12, वर्धा -12.2, सोलापूर -12.7 अंश.
पुण्यातील परिस्थिती काय –
पुण्यात आजही चालू हंगामातील निच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. पुण्यात 8.2 सेल्सियस तापमान नोंदलं गेलं असून उद्या नक्कीच तापमानात वाढ होईल, अशी माहिती पुणे वेधशाळेचे प्रमुख डॉ. अनुपम कश्यपी यांनी दिली आहे. तसेच उत्तरेतून थंड हवेची लाट निर्माण झाल्याने महाराष्ट्रात बहुतांश ठिकाणी पारा घसरल्याची माहितीही कश्यपी यांनी दिली आहे. येत्या दोन दिवसात राज्यातील थंडीची लाट नक्कीच कमी होईल, असंही कश्यपींनी म्हटलं आहे.